Home जळगाव चाळीसगावात इलेक्ट्रिक मोटार पंप चोरणारे तिघे पोलिसांच्या ताब्यात

चाळीसगावात इलेक्ट्रिक मोटार पंप चोरणारे तिघे पोलिसांच्या ताब्यात

110

आशाताई बच्छाव

1000597681.jpg

चाळीसगावात इलेक्ट्रिक मोटार पंप चोरणारे तिघे पोलिसांच्या ताब्यात
चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील- चाळीसगाव शहर पोलीसांनी इलेक्ट्रीक पंप चोरणाचे त्रिकूट ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे या त्रिकूटापैकी एकाच्या मैत्रिणीस एक हजार रूपयांची गरज असल्याने व तिला देण्यासाठी पैसे नसल्याने पंप चोरी करून तो विक्री करण्याचा बेत आखून चोरी केल्याची कबुली दिली आहे.
चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याकडून गस्तीदरम्यान संशयित वाहनांवर लक्ष ठेवून त्यांची तपासणी करण्यात येते.दि.30 रोजी दुपारी पोलीस उपनिरीक्षक योगेश माळी, हवालदार रवि पाटील, दीपक पाटील, प्रविण जाधव, शिपाई अमोल भोसले, गणेश कुवर, गोपाल पाटील हे घाट रोड परिसरात गस्त घालत असतांना तीन इसम दुचाकीवर इलेक्ट्रीक मोटारपंप घेऊन जातांना दिसले.
पोलीसांना त्यांचा संशय आल्याने त्यांना पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेऊन त्यांच्याकडील इलेक्ट्रीक पंपाबाबत विचारणा केली असता ते उत्तर देत नसल्याने पोलीसांनी मोटारपंपासह दुचाकी ताब्यात घेतली.या तिघांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 124 व भारतीय न्याय संहिता कलम 3(5)प्रमाणे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी दिली.
पोलीसांनी ताब्यात घेतलेल्या या तिघांची चौकशी केली असता सदर मोटारपंप हा त्यांच्यातीलच एकाच्या काकाच्या शेतातून चोरल्याची कबुली दिली. चोरीचे कारण विचाले असता या इसमांपैकी एकाच्या मैत्रिणीस 1 हजार रूपयांची गरज असल्याने व तिला देण्यासाठी पैसे नसल्याने इलेक्ट्रीक पंप चोरी करून तो विक्री करण्याची योजना केल्याची माहिती दिली.

Previous articleभाईका जामीन कराना है, म्हणून मागितली 25 हजार रुपये खंडणी
Next articleअंधश्रद्धा निर्मूलन ही काळाची गरज: – राहुल डोंगरे ( राजापूर येथे गोबरवाही पोलीस स्टेशन च्या वतीने आयोजित प्रबोधन कार्यक्रमात प्रतिपादन)
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.