आशाताई बच्छाव
अमरावती येथे एकास फोर व्हीलर ने
उडूवुन, व त्यांच्यावर चाकूने हल्ला करून केली हत्या.
दैनिक युवा मराठा.
पी एन देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.
अमरावती येथील राजापेठ पोलीस स्टेशन अंतर्गत केडिया नगर येथे महापालिकेच्या उद्यानासमोर २५ वर्षीय तरुणाची कारणे उडवून, गुरुवारी रात्री बाराच्या सुमारास चाकूने भोसकुन हत्या करण्यात आली. रोहित अमोल मांडळे वय२५ गोंडपुरा, राजापेठ अमरावती. असे मृतकाचे नाव आहे. राजापेठ पोलिसांनी या प्रकरणी ४संशीतांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. शुक्रवारी सकाळी ७.३०च्या सुमारास केडिया नगर बगीच्या समोर जागेचा पंचनामा केला. जुन्या वादातून ४ते५ तरुणाच्या जमावाने दुचाकीने रोहितला जोरदार धडक दिली. महापालिकेच्या या बगीच्या च्या प्रवेशद्वारा लागत कोसळल्यानंतर अज्ञात आरोपींनी त्याला चाकून ठार केले. तक्रारीनुसार रोहितच्या भावाचा वाढदिवस साजरा करण्यात येत होता त्यासाठी रोहित सह त्याच्या भावाचे ३०ते४० मित्र एकत्र आले होते. त्यांनी केक देखील सोबत आणला होता. दरम्यान अन्य एका मित्रासोबत बोलत असताना रोहित हा बगीच्या बाहेर आला. तू फोनवर बोलत असताना त्याला अज्ञात थोडक्याने दुचाकीने धडक दिली. तू खाली कोसळल्यानंतर त्याचे वर चाकूने सपासप वार करण्यात आले. घटनास्थळी रोहित सह त्याच्या भावाचे मित्र असताना कोणीही मदतीसाठी धावले नाही. रात्री १२.३०च्या सुमारास रोहितला रक्तबंबळ स्थिती जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले तेथे डॉक्टरने त्याला तपासून मृत घोषित केले. दरम्यान रोहित वर सुद्धा काही गुन्हे नोंदविल्या गेले असल्याचे समजले. त्यातून त्याची हत्या करण्यात आल्याचे प्राथमिक शक्यता राजापेठ पोलिसांनी वर्तवली आहे. पुढील तपास राजापेठ पोलीस स्टेशन खुनाची चौकशी करीत आहेत.