आशाताई बच्छाव
भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने जिल्हा कचेरीवर आंदोलन.
दैनिक युवा मराठा
पी एन देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.
नोकऱ्या व शिक्षणातील आरक्षणाची ५० टक्क्याची मर्यादा संसदेने त्वरित उठावयी यासह जातनिहाय जनगणना करण्याचा मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आज गुरुवार १८ जुलै रोजी जिल्हा कचेरीवर निदर्शने देण्यात करण्यात आली. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय कौशल सदस्य काॅ. तुकाराम भस्मे जिल्हा सचिव काॅ. सुनील मेटकर, राज्य कौशल सदस्य काॅ. अशोक सोनारकर यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात जिल्हाभरातील पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते. आंदोलनाच्या शेवटच्या टप्प्यात जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधीक्षक यांना निवेदनही देण्यात आले. या मुद्द्याला अनुसरून भाकपने देशव्यापी आंदोलनाची हाक दिली होती. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा कचोरीवर आंदोलन करण्यात आले. या मागणीसाठी विविध राज्यांमध्ये जनजागृती करून आंदोलने ही करण्यात आली. महाराष्ट्रात भारतीय कम्युनिस्ट पक्षाची सलग्न असलेल्या अखिल भारतीय दलित अधिकार आंदोलनाच्या वतीने संभाजीनगर येथे राज्यव्यापी जात न्याय जनगणना परिषदेही घेण्यात आली होती. भारतात १९३१साली जात निहाय जनगणना झाली होती. त्यामुळे ९४ वर्षानंतर हे मागास जातीसाठी कल्याणकारी योजनेची आखणी करताना १९३१च्याच जनगणनेचा आधार घेणे, अयोग्य आहे, अशी मांडणी यावेळी करण्यात आली. मुळात दर १० वर्षांनी जनगणना होत नंतर प्रलंबित असलेले २०२१ची जनगणना अध्यापि मोदी सरकारने सुरू केलेली नाही. ही जैन जनगणना तातडीने हाती घ्यावी व ती करताना जातनिहाय जनगणना करावी अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने केली आहे. दुसरीकडे आरक्षणाची मर्यादा ५० टक्के पेक्षा जास्त नसावी, यासाठी सरकारने संसदेत कारवाई करणे आवश्यक असल्याचे मत यावेळी आंदोलन करताना व्यक्त केले. या आंदोलनात काॅ. भाषणे यांच्यासह जिल्हा सहसचिव जे.एम. कोठारी, सुनील घटाळे, सागर दुर्योधन तसेच इतर पदाधिकारी डॉ. ओमप्रकाश कुटेमाटे, शरद मंगळे, लताताई सोनारकर, ऑड. क्रांती ताई देशमुख, चंद्रकांत वडस्कर, कैलास ठाकरे ,राहुल तेलमोरे, संजीव आढाव, हनुमंत चव्हाण, अनेक कार्यकर्त्यांसह आदींनी या आंदोलनात सहभाग घेतला होता.