आशाताई बच्छाव
“आषाढी एकादशी आणि मोहराम निमित्त केले दामिनी लघुचित्रपट प्रसारित”
युवा मराठा न्यूज संजय पन्हाळकर बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ
बुलढाणा :-भारतामध्ये नेहमीच विविधतेत एकता पाहायला मिळते. आपल्या देशात विविध जाती धर्माचे लोक एकत्र राहतात. प्रत्येक धर्माचे एक खास वैशिष्ट्य आहे. शिवाय प्रत्येक धर्मात विविध सण साजरे केले जातात. या प्रत्येक सणामागे एक धार्मिक आणि आध्यात्मिक महत्व दडलेले आहे.
हिंदू धर्मामध्ये आषाढी एकादशीचे खास असे महत्व आहे. वर्षभरातील सर्व एकादशींपैकी ही आषाढी एकादशी सर्वात मोठी आणि महत्वाची मानली जाते.
मोहरम हा मुस्लिम धर्मियांचा एक विशेष सण आहे. या सणाला शोकचा सण देखील म्हटले जाते. इस्लामनुसार मोहरम हा वर्षारंभ आहे. इस्लामिक मान्यतेनुसार ‘मोहरम’ हा एक शोक प्रदर्शन करण्याचा महिना आहे.
आषाढी एकादशी आणि मोहरम निमित्त वन्यजीव सोयरे बुलढाणा यांनी एक सामाजिक संदेश देणारा “दामिनी” लघुचित्रपट जनजागृतीसाठी प्रसारित केला आहे. या लघुचित्रपटाचे कलाकार राजिवकुमार तायडे, गजेंद्रसिंह राजपूत, अतुल करोड़पति, जगन्नाथ फकीरा इंगळे, दगड़ू माधवराव गाडेकर यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली असून संवाद शिवकुमार परदेसी येवला यांचे कैमरा आणि सहाय्यक दिग्दर्शक श्रीकांत पैठणे यांचे विशेष सहकार्य समस्त ग्रामस्थ बिरसिंगपुर, प्रा.डॉ.वंदना काकडे आणि अमित श्रीवास्तव यांचे तर कथा, पटकथा, संकल्पना, लेखन, दिग्दर्शन नितिन प्रतापसिंह श्रीवास्तव वन्यजीव सोयरे, बुलढाणा यांचे आहे. “भारत सरकारने विजेची माहिती देण्या संदर्भात ‘दामिनी’ नावाच मोबाइल ॲप आणले आहे त्याबाबत ग्रामीण भागात गांव खेड़यात जनजागृती करण्यासाठी वन्यजीव सोयरे प्रस्तुत “दामिनी” लघुचित्रपट बनविला आहे. प्रत्येक शहरी ग्रामीण भागातील नागरिकांनी You tube वर “दामिनी वन्यजीव सोयरे” लिहून शोधाव आणि आवश्य पाहावे असे आवाहन वन्यजीव सोयरे, बुलढाणा कडून वन्यजीव सोयरे नितिन श्रीवास्तव यांनी केले आहे.
नितीन श्रीवास्तव
वन्यजीव सोयरे, बुलढाणा.
मो.नंबर.९४२१४९४०४०.