Home रायगड पर्यटनस्थळी रील्स बनवाल तर होईल कारवाई; जिल्हा पोलिसांचे प्रतिबंधात्मक आदेश जारी

पर्यटनस्थळी रील्स बनवाल तर होईल कारवाई; जिल्हा पोलिसांचे प्रतिबंधात्मक आदेश जारी

145

पर्यटनस्थळी रील्स बनवाल तर होईल कारवाई; जिल्हा पोलिसांचे प्रतिबंधात्मक आदेश जारी

युवा मराठा न्यूज रायगड ब्यूरो चीफ :- मुजाहिद मोमीन

माणगाव तालुक्यातील कुंभे धबधबा येथे
पर्यटनासाठी आलेल्या रील्स स्टार अन्वी कामदार हीचा रील्स करताना पाय घसरून दरीत पडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली होती. या दुर्घटनेनंतर जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे धबधबे, नदी, धरण, डोंगर परिसरात रील्स बनवून जीव धोक्यात घालणारे स्टंट करण्याबाबत प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहे. पोलिसांनी केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचे पालन करावे आणि असे कोणी केल्यास त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी केले आहे.
पावसाळी पर्यटन जिल्ह्यात बहरत आहे. नदी, धरणे, धबधबे, जंगल भागात अनेक पर्यटक हे पावसाळी पर्यटनासाठी येत आहेत. मात्र निसर्गाचा आनंद घेताना काहीजण आपल्या हुल्लडबाजीमुळे, अती साहसी पणामुळे जीव गमावण्याच्या घटनाही घडत आहेत. नुकतेच मंगळवारी रील्स स्टार अन्वी कामदार हीचा कुंभे येथे दरीत पडून मृत्यू झाला. अन्वी ही आपल्या पाच सहकारी सोबत पर्यटनास आली होती.
कुभे येथील एका दरीच्या बाजूला असलेल्या कड्यावर अन्वी ही इंस्टाग्रामसाठी रील्स बनवत होती. मात्र हा तिचा शेवटचा रील्स ठरला. रील्स बनविण्याच्या नादात पाय घसरून ती ३०० फूट खोल दरीत कोसळली आणि तिचा मृत्यू झाला. बचाव पथकाने तिचा मृतदेह शोधून रुग्णालयात दाखल केला. त्यांनतर ती मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
रील्स बनवण्याच्या नादात अन्वी हिला आपला जीव गमावावा लागला आहे. त्यामुळे पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांनी असे साहसी कृत्य करून स्वतच्या जीवाला धोका निर्माण करीत आहे. त्यामुळे पर्यटन स्थळांवर रील्स बनवणे, साहसी कृत्य करणे याला बंदी असून जिल्हा पोलिस प्रशासनातर्फे प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. आदेशाचे पर्यटकांनी पालन करा, आदेशाची पायमल्ली केल्यास कडक कारवाई केली जाईल असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी पर्यटकांना केले आहे.

Previous articleशेतकऱ्यांच्या जमिनी परत मिळवून देणार, भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे यांची माहिती
Next articleजम्मु काश्मीर मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बुलडाणा येथे शिवसेनेचा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तीव्र निषेध….
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.