Home ठाणे शेतकऱ्यांच्या जमिनी परत मिळवून देणार, भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे यांची माहिती

शेतकऱ्यांच्या जमिनी परत मिळवून देणार, भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे यांची माहिती

38
0

आशाताई बच्छाव

1000561930.jpg

शेतकऱ्यांच्या जमिनी परत मिळवून देणार, भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे यांची माहिती

युवा मराठा न्यूज ठाणे ब्यूरो चीफ भिवंडी :- फय्याज मोमीन

भिवंडी लोकसभा मतदारसंघातून शरद पवार गटाचे उमेदवार सुरेश म्हात्रे ऊर्फ बाळ्यामामा ६६ हजार २९२ मतांनी विजयी झाले. दोन वेळा खासदार व केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री असलेले कपिल पाटील यांचा बाळ्यामामा यांनी पराभव केला आहे. शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम प्रथम करणार, असे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

तुमच्या विजयाचे श्रेय तुम्ही कोणाला देता?

[ माझ्या विजयाचे संपूर्ण श्रेय हे नागरिकांचे आहे. ही निवडणूक नागरिकांनी आपल्या हातात घेतल्यानेच केंद्रीय राज्यमंत्र्यांचा पराभव करणे शक्य झाले. पाटील यांच्या दादागिरीला सामान्यांनी दिलेले हे उत्तर आहे. दहा वर्षे खासदार व केंद्रीय राज्यमंत्री असूनही त्यांनी भिवंडीच्या विकासाकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे मतदारांनी आता त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. शेवटी जे पेराल तेच उगवेल आणि याची प्रचिती पाटील यांच्या पराभवातून समोर आली आहे.

भाजपमधील अंतर्गत वादाचा फायदा तुम्हाला झाला का?

[ हो निश्चितच झाला. २०१४ मध्ये पहिल्यांदा मोदी लाटेचा त्यांना फायदा झाला होता, तर २०१९ मध्ये संपूर्ण शिवसेना त्यांच्या सोबत होती. मात्र ते निवडून आल्यानंतर मोठ्या गुर्मीत राहिले. कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना कमी लेखणे, मनमानी करणे यामुळे मुरबाड आणि भिवंडीतील नागरिक त्यांच्यावर नाराज होते. किसान कथोरे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला दिलेली वागणूक चुकीची आहे. राजकारणात ‘हम करे सो कायदा’ अशी हेकेखोरी चालत नाही, हे बहुधा पाटील विसरले असावेत.

सांबरे यांच्या उमेदवारीमुळे तुमचा विजय झाला?

[ नीलेश सांबरे यांनी जातीचे राजकारण केल्यामुळे कुणबी मते निश्चितच त्यांच्या बाजूने वळली. मात्र मतदार मला साथ देतील यावर माझा विश्वास होता. त्यामुळे माझा विजय हा येथील नागरिकांमुळेच झाला असे मी मानतो.

खासदार म्हणून कुठल्या कामाला प्राधान्य असेल?

[ नागरिकांना धमकावणे, त्यांच्या जमिनी बळकावणे अशी कामे खासदार कपिल पाटल यांनी केली आहेत. येथील नागरिकांना धीर व आधार देत ज्या शेतकऱ्यांच्या जमिनींवर पाटील व त्यांच्या गुंडांनी व कार्यकर्त्यांनी कब्जे केले आहेत ते शेतकऱ्यांना परत देण्याचे काम मी आधी करणार आहे. काल्हेर येथील सरकारी जमिनीवर केलेल्या अतिक्रमणांची मी पाहणी केली.

नागरिकांचे कुठले प्रश्न सोडवणे गरजेचे आहे?

[ भिवंडीत सध्या वाहतूककोंडीची समस्या गंभीर झाली आहे. येथील रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करून पावसाळ्यात होणारी वाहतूककोंडी तातडीने सोडविणे गरजेचे आहे.

Previous articleरायगड जिल्ह्यात रील्सना ‘नो ढील’; धोकादायक ठिकाणी बंदी; उल्लंघन केल्यास होणार कारवाई
Next articleपर्यटनस्थळी रील्स बनवाल तर होईल कारवाई; जिल्हा पोलिसांचे प्रतिबंधात्मक आदेश जारी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here