Home मुंबई वंचितच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रेखाताई ठाकूर यांचे पती अरुण ठाकूर यांचे दुःखद...

वंचितच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रेखाताई ठाकूर यांचे पती अरुण ठाकूर यांचे दुःखद निधन

260

आशाताई बच्छाव

1000557994.jpg

वंचितच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रेखाताई ठाकूर यांचे पती अरुण ठाकूर यांचे दुःखद निधन

 

 

मुंबई ,(संजीव भांबोरे)वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांचे पती तथा ‘युक्रांद’चे जेष्ठ नेते अरुण ठाकूर यांचे आज बुधवार दिनांक 17 जुलै रोजी उपचारा दरम्यान दुःखद निधन झाले. गुरुवार 18 जुलै रोजी सकाळी 11 वाजता मुलुंड पश्चिम येथील पाच रस्ता स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.

भारतीय आयटी उद्योगाच्या स्थापनेत अरुण ठाकूर यांचा सिंहाचा वाटा होता. IRCTC (रेल्वे आरक्षण साइट), BOLT (BSE ची बॉम्बे ऑनलाइन व्यवहार प्रणाली), पोर्ट्स आणि कॉर्गो संगणकीकरण आणि ऑटोमेशन करण्याची जबाबदारी त्यांनी प्रकल्प संचालक म्हणून पार पाडली आहे. जगभरातील 35+ आंतरराष्ट्रीय बंदरे त्यांच्या नेतृत्वात संगणीकृत करण्यात आली आहेत. तत्कालीन पंतप्रधान श्री राजीव गांधी यांना बंदर आणि मालवाहतूक संगणीकृत करण्याच्या डेमो अरुण ठाकूर यांनीच दिले होते.

समाजवादी चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. आज सकाळी 11 वाजता मुलुंड येथील पाच रस्ता स्मशानभूमी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
त्यांच्या पश्चात पत्नी रेखा ठाकुर, मुलगी प्रा. डाॅ. सई ठाकूर, मुलगा सौरभ असा परिवार आहे.

Previous articleकोसगाव येथे घाणीचेसाम्राज्य ग्रामपंचायतचे दुर्लक्ष….
Next articleचामोर्शी येथे मुल-आष्टी चौकात मा.सा कन्नमवार यांचा पुतळा उभारा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.