Home अमरावती अवैद्य सावकारवर सहकार विभागाची धाड; कोरे धनादेश, मुद्रांक, आक्षेपार्य कागदपत्रे जप्त.

अवैद्य सावकारवर सहकार विभागाची धाड; कोरे धनादेश, मुद्रांक, आक्षेपार्य कागदपत्रे जप्त.

121

आशाताई बच्छाव

1000552127.jpg

अवैद्य सावकारवर सहकार विभागाची धाड; कोरे धनादेश, मुद्रांक, आक्षेपार्य कागदपत्रे जप्त.
दैनिक युवा मराठा.
पी.एन
देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती. (वेनि गणेशपुर).
अवैध सावकाराची तक्रारीच्या अनुषंगाने सहकार विभागाने नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील वेणी गणेशपूर येथील दिलीप जयस्वाल व रोहित जयस्वाल यांच्या घरी धाड टाकली. त्यांच्या घरून या पथकाने आक्षेपार्य कागदपत्रे, कोरे धनादेश, कोरे स्टॅम्प पेपर आदी जप्त करण्यात आले. मकत्याने दिलेल्या शेतीचा ताबा देत नसल्याने अवैध सावकारीची माहिती तक्रारदाराने जिल्हा उपनिबंधाकडे दिली होती. याची शहानिशा व पडताळणी करून कारवाई करण्याचे निर्णय जिल्हा उपनिबंधक शंकर कुंभार यांनी सहाय्यक निबंध सचिन पतंगे यांना दिले. त्यानुसार ही दहा टाकण्यात आली. महाराष्ट्र सावकारी(नियम) अधिनियम२०१४चे कलम १६ नुसार तक्रारीची कारवाई करण्यात आली. या कारवाईत गजानन वाडेकर, अमोल लोमटे, आशिष भांडे, उज्वला मोहोळ, वसंत शेळके, शुभांगी नंदेश्वर यांच्यासह पोलीस पथकाने सहभाग घेतला होता.