Home नांदेड लाडकी बहीण योजनेसाठी जनजागृती नोंदणी शिबिराचे आयोजन.

लाडकी बहीण योजनेसाठी जनजागृती नोंदणी शिबिराचे आयोजन.

168

आशाताई बच्छाव

1000548875.jpg

लाडकी बहीण योजनेसाठी जनजागृती नोंदणी शिबिराचे आयोजन.
शिवसेना नांदेड जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख उमेश मुंडे साहेब व देगलूर तालुका प्रमुख गंगाधर तमलुरकरव यांनी घेतला नोंदणी अभियान.

देगलूर तालुका प्रतिनिधी /गजानन शिंदे

देगलूर : राज्य सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात महिलांसाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे . यास मोठा प्रतिसाद मिळत असून यासंदर्भात अधिकाधिक जनजागृती व्हावी व महिलांना आपल्या भागातच घर बसल्या या योजनेची नोंदणी करता यावी म्हणून शिवसेना शिंदे गटाचे देगलूर तालुका अध्यक्ष गंगाधर तमलुरकर यांनी देगलूर तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये जाऊन वार्डनिहाय नोंदणी अभियान हाती घेतलेले आहे त्यामुळे हजारो लाभार्थी महिलांची गैरसोय तळली आहे.
महाराष्ट्र राज्यातील 21 ते 65 वर्ष वयोगटातील विवाहित महिला, विधवा, घटस्फोटीत तसेच निराधार महिलांना याचा फायदा मिळणार आहे एकाच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला, एका कुटुंबातील दोन महिलांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे. या योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट असून ज्या महिला संजय गांधी निराधार योजना किंवा इतर योजना अंतर्गत 1500 रुपये पेक्षा जास्त अनुदान घेत असतील अशा महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. अशा महिलांनी या योजनेसाठी अर्ज करू नयेत, असे आव्हान सरकारच्या वतीने करण्यात आली आहे.
नोंदणीसाठी वार्डनिहाय कॅम्प मुख्यमंत्री लाडकी भयाने योजनेच्या अंतर्गत जनजागृती व नोंदणी फार्म भरून घेण्यासाठी देगलूर तालुका शिवसेना शिंदे गटाचे तालुकाध्यक्ष गंगाधर तमलुरकर व शहराध्यक्ष व्यंकट पूरमवार, शिवसेना जिल्हाप्रमुख महिला वनमला ताई राठोड, उपजिल्हा महिला आघाडी सविता ताई चप्पलवार ,महिला तालुकाप्रमुख मीराताई तमलुकर, महिला शहर प्रमुख लक्ष्मीताई गायकवाड .शिवाजी हेडगुळ .अमोल स्वामी. उप तालुका प्रमुख संतोष भुपतवार. तालुका संघटक महेश करंडे. वाट यांच्या माध्यमातून गंगाधर ढवळे, दिगंबर जाधव, बालाजी तोटावर, नागेश जोशी, सिद्धार्थ ढवळे, अमोल स्वामी आधी शिवसेना कार्यकर्त्यांसह आपल्या माध्यमातून देगलूर तालुक्यातील हाणेगाव , लोणी, तमलुर, शहापूर ,खानापूर, लखा, कावळगाव, बोरगाव, माळेगाव, करडखेड, सेवालाल, भायगाव, आधी गावामध्ये या नोंदणी शिबिर घेण्यात आली आहे. वही नोंदणी शिबिर मोहीम असेच देगलूर तालुक्यामध्ये चालू ठेवण्याचे सांगण्यात आले आहे यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसह महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थित होती.