Home उतर महाराष्ट्र विधायक उपक्रम आश्रमासह विद्यार्थिनींना दिला खाऊ, गणवेश, पुस्तके, औषधे ‘आनंदवन’ची ‘कृष्णाई’स साहित्य...

विधायक उपक्रम आश्रमासह विद्यार्थिनींना दिला खाऊ, गणवेश, पुस्तके, औषधे ‘आनंदवन’ची ‘कृष्णाई’स साहित्य भेट

109

आशाताई बच्छाव

1000546257.jpg

विधायक उपक्रम आश्रमासह विद्यार्थिनींना दिला खाऊ, गणवेश, पुस्तके, औषधे ‘आनंदवन’ची ‘कृष्णाई’स साहित्य भेट
नेवासे (कारभारी गव्हाणे तालुका प्रतिनिधी.) तालुक्यातील सोनई येथील पसायदान-आनंदवन सेवाभावी संस्थेच्या वतीने कावड (ता. राहुरी) येथील कृष्णाई गुरुकुल वारकरी शिक्षण संस्थेतील ७० मुलींसह आश्रमास विविध प्रकारचे आवश्यक साहित्य भेट देण्यात आले. आषाढी एकादशीच्या पर्वकाळात लहान मुलींमध्ये लक्ष्मीचे रूप आणि कार्यात माऊलीची सेवा पाहून राबविण्यात आलेल्या या आध्यात्मिक उपक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे.
कृष्णाई संस्थेचे प्रमुख गणेश महाराज नवले यांनी मुलीच्या शैक्षणिक व आध्यात्मिक कार्याची माहिती दिली. आर्ट ऑफ लिव्हिंगचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक प्रशांत लालचंदानी यांनी घेतलेल्या सत्संगात मुलींना ध्यान व योग-प्राणायामाचे महत्त्व सांगितले, सोनई केंद्राचे प्रमुख अॅड. सुनील गडाख व संत निरंकारी परिवाराचे
विठ्ठल महाराज खाडे यांची शुभेच्छापर भाषणे झाली.
यावेळी आनंदवन संस्थेचे सचिव संजय गर्ने म्हणाले, की ही मदत नसून, कर्तव्य आहे. उपाध्यक्ष विनायक दरंदले, किशोर घावटे, डॉ. तुषार दराडे, कृष्णा सुद्रिक, अरुण घावटे, मंदीप घोलप, सच्चिदानंद कुरकुटे, अमित बंग उपस्थित होते. संस्थेचे खजिनदार रमेश घुगरकर यांनी आभार मानले.

Previous articleआमदार कृष्णा गजबे यांच्या सेवावृत्तीचे पुन्हा दर्शन अपघातग्रस्ताच्या मदतीला धावले आमदार कृष्णा गजबे
Next articleरोह्यातील कुंडलिकेने धोक्याची पातळी ओलांडली; भातशेती जलमय, लागवडीची कामं खोळंबली
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.