Home अमरावती रेशन कार्डधारकांसाठी मोबाईल लिंक, आता मोबाईलवर मेसेज कळणार”रेशनची”माहिती, धान्य पुरवठा विभागाची सुविधा.

रेशन कार्डधारकांसाठी मोबाईल लिंक, आता मोबाईलवर मेसेज कळणार”रेशनची”माहिती, धान्य पुरवठा विभागाची सुविधा.

120
0

आशाताई बच्छाव

1000537941.jpg

रेशन कार्डधारकांसाठी मोबाईल लिंक, आता मोबाईलवर मेसेज कळणार”रेशनची”माहिती, धान्य पुरवठा विभागाची सुविधा.
दैनिक युवा मराठा
पी.एन. देशमुख
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.
रेशन कार्ड धारकाच्या धान्य दुकानात आल्यापासून त्यांना किती मिळेल, याचा एसएमएस संबंधित कार्डधारकासह त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या मोबाईलवर मिळणार आहे. यासाठी रेशन दुकानदारा द्वारा संबंधितांचे मोबाईल क्रमांक फोरजी मशीन मध्ये लिंक करण्यात येत आहेत. सार्वजनिक अन्नधान्य वितरण प्राण्यांमध्ये पारदर्शी पद्धतीने रेशन धान्याचे वाटप व्हावे, यासाठी पुरवठा विभाग आग्रही आहे. यामध्ये वेळोवेळी अनेक बदल करण्यात आलेले आहे. लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचे धान्य मिळावे, यासाठी पुरवठा विभागात द्वारा रेशन कार्ड धारकांचे मोबाईल क्रमांक मशीन मध्ये जोडण्यात येत आहे. सध्या देखील ही प्रक्रिया सुरू आहे. या मोबाईल क्रमांकावर येणारे एसएमएस ऑटो जनरेटेड असल्याची माहिती जिल्हा पुरवठा विभागाने दिली. जिल्ह्यात एकूण अंतोदय व प्राध्यानगटात ४,९४,२१६ रेशन कार्ड धारक आहेत. व यामध्ये १९,६२,३४४ सदस्य संख्या आहे. यापैकी सद्यस्थितीत २,९२,१४८ रेशन कार्ड धारकांनी मोबाईल जोडण्याची प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. हे प्रमाण ५९.११ टक्के आहे. पोर्टल द्वारे आटो जनरेटर एसएमएस संबंधित रेशन कार्डधारकांना मिळत आहे. याद्वारे धान्याची उचल केल्याची माहिती, मिळालेल्या धान्याचा संदेश संबंधितांच्या मोबाईलवर प्राप्त होत आहे. सर्व रेशन कार्ड धारकांनी मोबाईल क्रमांकाची जोडणी करण्याचे आव्हान सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी प्रज्वल पाथरे यांनी केली आहे. ठसा जुळत नाही तर ओटीपी द्वारे धान्य मिळणार आहे. बरेचदा संबंधित रेशन कार्डधारकांचा ठसा जुळत नाही, अशावेळी जोडणी केलेल्या मोबाईलवर ओटीपी देण्यात येतो व त्याद्वारे ओळख पटवून त्यांना रेशनचे धान्य मिळते. ही सुविधा मोबाईल जोडणीमुळे उपलब्ध होते. शिवाय रेशन धान्याची उचल व वितरणाची माहिती मिळते. रेशन कार्ड धारकांच्या कुटुंबातील मोबाईल दोन्ही केलेल्या सर्व सदस्यांना ही सुविधा उपलब्ध असल्याची माहिती पुरवठा विभागांनी दिली.

Previous articleअमरावती मनपातील संगणक कक्षाची भिंत कोसळली दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा
Next articleमहाराष्ट्र कृषी क्रांतीचा जनक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here