Home अमरावती गरिबांना दिल्या जाणाऱ्या पिशव्यांचे वाटप अजूनही १० टक्क्यावरच: साड्यांचे वाटपही २५ टक्के...

गरिबांना दिल्या जाणाऱ्या पिशव्यांचे वाटप अजूनही १० टक्क्यावरच: साड्यांचे वाटपही २५ टक्के दूरच

26
0

आशाताई बच्छाव

1000531637.jpg

गरिबांना दिल्या जाणाऱ्या पिशव्यांचे वाटप अजूनही १० टक्क्यावरच: साड्यांचे वाटपही २५ टक्के दूरच
दैनिक युवा मराठा
पी.एन. देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.
सरकार तर्फे अंतोदय कुटुंबातील महिलांना दिल्या जाणाऱ्या साड्या आणि अंत्योदय सह प्राधान्य गटातील लाभार्थ्यांना दिला जाणाऱ्या कापडी पिशव्यांचे वाटप अजूनही राखडले आहे. अमरावती जिल्ह्यात आतापर्यंत केव्हा ९.७९ लाभार्थ्यापर्यंत पिशव्या पोहोचल्या. त्याचवेळी साड्यांचे वाटपही २५ टक्के लाभार्थ्यापासून दूरच आहे. लोकसभा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी राज्य सरकारने अंतोदय रेशन कार्ड असलेल्या महिलांना साड्या व कापडी पिशव्या वितरित करण्याची घोषणा केली होती. भोसले नंतर लगेच या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली. रेशन दुकाना मार्फत या दोन्ही बाबी आभार त्यापर्यंत पोहोचविण्यात येत होत्या. परंतु मध्येच लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली आणि आचारसंहितेमुळे वितरण थांबविण्यात आले. आता आचारसंहिता संपुष्टात येऊन देखील एक महिन्याचा कालावधी लोटला आहे. परंतु तरीही साड्या आणि कापडी पिशवीच्या वितरण व्यवस्थेने हवा तसा वेग घेतला नाही.दोन दिवसापूर्वी पर्यंत जिल्ह्यात झालेल्या साड्यांचे वाटप ७५.५८ टक्क्यावर पोचले असून कापडी पिशव्यांचे वाटप अवघे ९.७९ टक्क्यावरच थांबले आहे. त्यामुळे यंत्र नेने दोन्ही जिन्नसाच्या वितरणाची गती वाढवून किमान विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिते पुरी तरी साड्या व पिशव्यांचे वितरण करावे, अशी संबंधित योजनेच्या लाभार्थ्यांची मागणी आहे साड्यांच्या लाभार्थ्यांची संख्या १ लाख २७ हजार ४६५ असून कापडी पिशव्यांची आहे आमदार असल्याची संख्या ४ लाख ८५ हजार ४९० एवढी आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात आतापर्यंत २ लाख ९५ हजार पीशव्या प्राप्त झाल्या. ऐकुन लाभार्थ्यांच्या तुलनेत ही संख्या ६०.७६ टक्के एवढी आहे. मात्र वितरणाची गती रोड वाल्यामुळे वितरणाचे प्रमाण फक्त ९.७९ एवढ्यावरच थांबले आहे. लोकसभा निवडणुकीची दोन महिने चाललेल्या आचारसंहिता हे कमी वितरण मागची मूळ कारण आहे. यंत्रणाच्या मते एप्रिल आणि मे महिन्यात साड्या तसेच कापडी पिशव्यांचे वितरण करता आले नाही. दरम्यान ४ निकालानंतर आचारसंहिता दूर झाली. वेग घेतला असून येत्या काळात दोन्ही जिन्हसांचे वितरण पूर्णतत्त्वास जाईल. पाॅश मशीनचीही अडचण सध्या जिल्ह्याभरातील रेशन दुकानांमध्ये रेशन कार्डच्या दुकानांमध्ये केवायसी चे काम सुरू आहे. त्यामुळे दुकानदारांना त्यांच्या नियमित कामाकाजातील आधीका अधिक वेळ यासाठी घ्यावा लागतो. शिवाय न असल्यास पाॅश मशीन मध्ये कोणतीही नोंद करता येत नाही. त्यामुळे साड्या आणि पिशव्यांचे वितरण झाले असले तरी त्यांच्या नोंदी अध्याप मशीनमध्ये उमटल्या नाहीत त्यामुळे एकूण टक्केवारी घसरलेली दिसुन येतो.

Previous articleहिट ॲण्ड रन’ घटनेने पुन्हा पुणे हादरले; दोन पोलिसांना भरधाव कारने उडवले; एका पोलिसाचा मृत्यू, दुसरा गंभीर
Next articleस्त्री जातीचा अपमान करणाऱ्या अपशब्द वर कायदेशीर बंदी आणा, पत्रकार परिषदेत मागणी.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here