Home जळगाव रोटरी क्लब ऑफ मिल्क सिटी संगम च्या वतीने अपंग बांधवाना तीनचाकी सायकल...

रोटरी क्लब ऑफ मिल्क सिटी संगम च्या वतीने अपंग बांधवाना तीनचाकी सायकल वाटप

124

आशाताई बच्छाव

1000529785.jpg

रोटरी क्लब ऑफ मिल्क सिटी संगम च्या वतीने अपंग बांधवाना तीनचाकी सायकल वाटप

चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील- रोटरी क्लब ऑफ मिल्क सिटी संगम च्या वतीने दरेगाव ता चाळीसगाव येथील अपंग बांधव गोटीराम सोनवणे यांना तीनचाकी सायकल मोफत देण्यात आली.
सामाजिक सेवेच्या भावनेतून रोटरी क्लब ऑफ मिल्क सिटी संगम चाळीसगाव च्या वतीने गरजू लोकांना मदत केली जाते त्यात अनेकांना विविध प्रकारच्या वस्तू देखील दिल्या जातात मागील आठवड्यात अनेक अपंग बांधवाना 3 चाकी सायकल चे वाटप करण्यात आले.
मात्र सायकल नुसती चालवून काय होणार तर त्या सायकल चा उपयोग अपंग बांधवांनी रोजगारासाठी करावा अशी कल्पना रवी शिरूडे यांना सुचली व त्यांनी तात्काळ अध्यक्ष डॉ सौ भाग्यश्री शिनकर व रोटरीचे सहकारी यांना सांगितले असता सर्वांनी निर्णय घेवून तीन चाकी सायकल ला रिक्षा सारखा छोटा टफ बसवून छोटया वस्तू विक्रीसाठी थोडीशी जागा बनवून घेतली व त्या सायकल वाटप केल्या.
या सायकल मुळे गोळया बिस्कीट व इतर वस्तू विकून अपंग बांधवांना आता रोजगार देखील उपलब्ध होणार आहे.
दि 8 जुलै रोजी तालुक्यातील दरेगाव येथील अपंग बांधव गोटीराम सोनवणे यांना तीनचाकी सायकल देण्यात आली यावेळी
रोटरी क्लब ऑफ मिल्क सिटी संगम
सुधीर आबा पाटील, रविद्र शिरुडे, आधार महाले, प्रकाश कुलकर्णी, रमेश पोतदार उपस्थित होते.

Previous articleश्रीरामपूर जिल्हा करावा या मागणीसाठी रविवार दि. 14 जुलै रोजी श्रीरामपूर बंदची हाक
Next articleसाखरपुडा कार्यक्रम मधून पर्स लंपास मोबाईलसह रोकडची चोरी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.