Home नाशिक मद्यसाठा घेऊन जाणाऱ्या वाहनाचा पाठलाग करताना एक्साईजची स्कॉर्पिओ उलटली; एक कर्मचारी ठार,...

मद्यसाठा घेऊन जाणाऱ्या वाहनाचा पाठलाग करताना एक्साईजची स्कॉर्पिओ उलटली; एक कर्मचारी ठार, दोन पोलीस जखमी

77
0

आशाताई बच्छाव

1000529359.jpg

मद्यसाठा घेऊन जाणाऱ्या वाहनाचा पाठलाग करताना एक्साईजची स्कॉर्पिओ उलटली; एक कर्मचारी ठार, दोन पोलीस जखमी

नाशिक,(ब्युरो चीफ दिलीप चव्हाण)- मद्यसाठा घेवून धावणाऱ्या अज्ञात वाहनाचा पाठलाग करताना राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सरकारी वाहन उलटल्याचा प्रकार चांदवड-मनमाड रोडवरील हरनुल टोलनाक्याजवळ घडला. मद्यसाठा घेऊन संशयास्पदरित्या धावणाऱ्या अज्ञात वाहनाने कट मारल्याने हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. अपघातात राज्य उत्पादन शुल्कचा एक कर्मचारी जागीच ठार तर दोघे पोलीस जखमी झाले आहेत. पोलिसांकडून अज्ञात वाहनाचा शोध सुरू आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्रीच्या सुमारास गुजरात राज्याकडून नाशिककडे मद्यसाठा घेवून जाणाऱ्या अज्ञात क्रेटा वाहनाचा राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून स्कॉर्पिओ वाहनातून पाठलाग सुरु होता. यावेळी संशयास्पदरित्या धावणाऱ्या अज्ञात वाहनाने कट मारल्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वाहनाचे नियंत्रण सुटले.

नियंत्रण सुटल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाचे वाहन अचानक उलटले. या अपघातात एक चालक कर्मचारी जागीच ठार झाला. कैलास गेनू कसबे (50, रा. नाशिक) असे मयताचे नाव आहे. तर राहुल पवार हा पोलीस कर्मचारी या घटनेत गंभीर जखमी झाला. तर आणखी एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. हा अपघात चांदवड – मनमाड रस्त्यावरील जुना हरनुल टोल नाक्याजवळ घडला. जखमी राहुल पवार यांच्यावर नाशिक येथे उपचार सुरू आहे. दरम्यान, मद्यसाठ्याची वाहतूक करणाऱ्या अज्ञात वाहनाचा पोलीस शोध घेत आहे.

Previous articleअखिल भारतीय भ्रष्टाचार संघर्ष समितीच्या मराठवाड्याच्या विभागीय अध्यक्ष पदी गोकुळसिंग राजपूत.
Next articleदलाई लामा पंचशीलाची जिवंत प्रतिमूर्ती_अमृत बन्सोड
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here