Home गडचिरोली गडचिरोलीत जुन्या वादातून दिवसाढवळ्या हत्येचा प्रयत्न

गडचिरोलीत जुन्या वादातून दिवसाढवळ्या हत्येचा प्रयत्न

18
0

आशाताई बच्छाव

1000522381.jpg

गडचिरोलीत जुन्या वादातून दिवसाढवळ्या हत्येचा प्रयत्न

गडचिरोली,( सुरज गुंडमवार ब्युरो चीफ)

गडचिरोली: जुन्या वादाचा राग मनात धरून ठेवून दिवसाढवळ्या भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यावर चाकूने हल्ला करत हत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना गडचिरोली शहरातील टि पॉईंट चौकात गुरुवार 27 जून रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारात घडली. सौरभ ताटिवर ( वय 26) रा. असे आरोपीचे नाव आहे. सदर घटनेने गडचिरोली शहरात खळबळ उडाली आहे.

प्राप्त माहितीनुसार, भूमी अभिलेख कार्यालय गडचिरोली येथे शिपाई पदावर कार्यरत असलेले दिनेश काकडे (वय 25) मू.पो.ता.मानवत जि.परभनी ( हल्ली मुक्काम गडचिरोली) हे दुपारच्या सुमारास टी पॉईंट चौकातील मेस मध्ये जेवण करत असतानां आरोपी सौरभ ताटीवर याने धारदार शस्त्राने यांच्यावर वार करीत गळा चिरला. दरम्यान जवळच असलेल्या नागरिकांनी धावघेत आरोपीस रोखले. यावेळी आरोपीने नागरिकांन सोबत झटापट केल्याचे कळते.दिनेश काकडे यांच्या गळ्यावर व कुशीत गंभीर जखम झाली लगेच काकडे यांना जिल्हा सामान्य रुग्णालय येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले असून प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.आरोपी सौरभ ताटेवर यास गडचिरोली पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास गडचिरोली पोलीस करित आहेत.

Previous articleदेवळ्यात चोरांचा सुळसुळाट; भरदिवसा चोरट्यांनी सेवानिवृत्त शिक्षकाला लुबाडले
Next articleभरधाव एस.टी.बस ने दुचाकी चालकाला चिरडले.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here