आशाताई बच्छाव
नेरला गावाचे पुनर्वसन करण्यात यावे याकरिता रस्ता रोको आंदोलन
कार्यकारी अभियंता पुनर्वसन विभाग यांच्या लेखी आश्वासनानंतर रास्ता रोको आंदोलन मागे
संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) भंडारा ते पवनी मुख्य मार्गावर असलेल्या नेरला गाव गोसे प्रकल्प बाधित क्षेत्रात येत असून गावाचे पुनर्वसन करण्यात यावे. याकरिता आज दिनांक 5 जुलै 2024 पवनी ते भंडारा मुख्य मार्गावर असलेल्या नेरला बसस्थानकावर 1 तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी येणाऱ्या जाणाऱ्या वाहतूकीस अडथळानिर्माण झाला होता व पोलिसांची दमछक सुद्धा उडाली होती. या आंदोलनाचे नेतृत्व ग्रामपंचायत चे संपूर्ण पदाधिकारी व गावकऱ्यांनी यांनी केले. यावेळी पुनर्वसन विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन गावकऱ्यांसमोर लेखी आश्वासनाचे पत्र दिले. नेरला गावाचे तातडीने मोजमाप करून मोबदला देण्यात यावे हे गावकऱ्यांची मागणी त्यांनी मंजूर केली असून याकरिता घराचे/ खुली जागेचे मोजमाप करण्याचे काम दिनांक 3/ 7/2024 पासून 6 अभियंता अधिकाऱ्यांच्या समुद्वारे सुरू करण्यात आली असून मोजण्याची कारवाई सुरू करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. लवकरात लवकर गावठाण ची जागा निश्चित करण्यात यावी ही सुद्धा मागणी त्यांनी मंजूर केली असून पर्यायी गावठाण मौजा अड्याळ मूळ मंजुरीतील 743 कुटुंबाकरिता 80 हेक्टर जागा उपलब्ध आहे. परंतु सद्यस्थितीत कुटुंबसंख्या 12 36 प्रमाणित झाल्यामुळे वाढीव कुटुंबाच्या दृष्टिकोनातून अतिरिक्त 40 हेक्टर जागेच्या मंजुरीची कारवाई लवकरच सुरू करण्यात येईल .प्रकल्प बाधित कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरी देण्यात यावी शासन स्तरावरील धोरणात्मक असल्याचे त्यांनी सांगितले प्रकल्प बाधित कुटुंबाचे नाव अंतोदय यादीत समाविष्ट करण्यात यावे . व योजनेचा संपूर्ण लाभ देण्यात यावा ही मागणी सुद्धा शासन स्तरावर धोरणात्मक बाब असल्याचे सांगितले.प्रकल्पग्रस्त कुटुंबातील व्यक्तींना शासकीय नोकरी न दिल्यास 20 लाख रुपये देण्यात यावे ही बाब सुद्धा शासन स्तरावरील असल्याचे लेखी आश्वासन कार्यकारी अभियंता गोसेखुर्द पुनर्वसन विभाग पथक नागपूर यांनी रास्ता रोको आंदोलनकारी यांना दिनांक 5 जुलै या 2024 ला दिले .यावेळी सरपंच छाया बारेकर ,दीपक पाल ओमप्रकाश खोब्रागडे ,संजय तळेकर ,संतोष आरिकर, निशांत रामटेके ,अनिल कोदाणे ,शैलेश शहारे ,वैशाली कुबळे ,लक्ष्मी आरिकर ,उपस्थित होते .यावेळी अड्याळाचे ठाणेदार धनंजय पाटील ,हेमराज सोरते पोलीस उपनिरीक्षक, पीएसआय हरिचंद इंगोले , मनोज सिडाम डीवायएसपी पवनी, व मोठ्या संख्येने पोलिसांचा बंदोबस्त होता यावेळी गावातील संपूर्ण गावकऱ्यांनी व महिलांनी या रास्ता रोको आंदोलनात सहभाग घेतला.