Home युवा मराठा विशेष संघर्षाचा धगधगता निखारा राजेंद्र पाटील राऊत

संघर्षाचा धगधगता निखारा राजेंद्र पाटील राऊत

308

आशाताई बच्छाव

1000497530.jpg

संघर्षाचा धगधगता निखारा
राजेंद्र पाटील राऊत
(प्रविण क्षीरसागर प्रतिनिधी)
मालेगावराजेंद्र पाटील राऊत हे नाव जरी आज आपण ऐकलं, तरी या नावामागे किती संघर्ष व अडचणी संकटांना सामोरे जाऊन आज हे नाव संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येकाच्या परिचयाचे झाले आहे.अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे जन्म झालेले राजेंद्र पाटील राऊत यांचे संपूर्ण बालपण आजोळी कौळाणे (नि) या नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात असलेल्या खेड्यात गेले.लहानपणीच वडील देवाघरी गेल्याने,व गरिबीचे चटके काय असतात याचा दाहक व वास्तव अनुभव राजेंद्र पाटील राऊत यांनी जवळून घेतला.लहानपणापासून अन्यायाविरुद्ध लढण्याची शक्ती त्याच्यात निर्माण झाल्याने त्यांनी अनेक प्रकरणांत लढाऊ भुमिका घेऊन कित्येकांना न्याय मिळवून दिला.आपले जीवनच परोपकारासाठी आहे.ही भावना मनाशी ठेऊन सतत न्यायासाठी लढणारा हा अवलिया वयाच्या पंधराव्या सोळाव्या वर्षी कौळाणे येथील ग्रामपंचायतीवर सन ८५-८६ च्या सुमारास आदिवासी बांधवांच्या न्याय हक्कासाठी आमरण उपोषणाचे रणसिंग फुंकले.आणि सलग चार दिवस उपोषणातून आदिवासी बांधवांना न्याय मिळवून दिला.त्यानंतर मुंबईत मंत्रालयासमोर उपोषण आंदोलन करुन मालेगाव तालुक्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या केल्यात.त्याशिवाय कौळाणे गावात वास्तव्यास असताना राजेंद्र पाटील राऊत यांनी तलाठी चंद्रकांत कुरील यांच्या सहकार्याने कौळाणे,नगाव,व-हाणेपाडा भागातील अनेक निराधार महिलांना शासनाच्या इंदिरा पेन्शन योजनेचा लाभ मिळवून दिला.संघर्षातून जीवन जगत असताना राजेंद्र पाटील राऊत यांनी परिसरातील अनेक नागरिकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी अथक परिश्रम करून न्याय मिळवून दिला.झाडी ता.मालेगाव येथील दलित महिलेस शेतजमीन प्रकरणात न्याय मिळवून दिला,तर तिसगाव या.देवळा येथील दलित कुटूंबावर शेतजमिनीच्या निर्माण झालेल्या वादातून सरळ मार्ग काढून न्याय मिळवून दिला.समाजकारण करीत असताना राजेंद्र पाटील राऊत यांनी राजकारणात सुध्दा नशीब आजमावून पाहिले,सोनज जिल्हा परिषद गटातून प्रथमच वयाच्या अठराव्या वर्षी निवडणूक लढवून आपले अस्तित्व दाखवून दिले.त्यानंतर राजकारण हा विषय बाजूला ठेवून फक्त आणि फक्त सामाजिक कार्य या गोष्टीलाच महत्त्व दिले.आज व-हाणे सारख्या प्रश्नावर अनेक आंदोलनं केलीत.त्यातून प्राणघातक हल्ला सारखा प्रकार घडला, तरीही राजेंद्र पाटील राऊत डगमगले नाहीत.त्यांचा संघर्षात्मक लढा अजूनही चालूच आहे.तर अगदी अलिकडेच मांगीतुंगी भिलवाड येथील आदिवासी बांधवांच्या हक्कासाठी व प्रश्नांवर लढा उभारून आदिवासी बांधवांना न्याय मिळवून दिला.त्याशिवाय राजेंद्र पाटील राऊत यांनी आजवर अनेक चांगले वाईट अनुभव घेतलेले आहेत.जे रक्ताचे नातेवाईक असतात ते सुध्दा साथ सोडून पाठ फिरवून जातात.कारण सत्य हे प्रत्येकालाच पचनी पडेल असं नाही, म्हणून तर राजेंद्र पाटील राऊत हे अगदी लहानपणापासून एकाकी लढताहेत, सत्यासाठी संघर्षाच्या मैदानात उभा असलेला हा धगधगता निखारा आहे.आज राजेंद्र पाटील राऊत हे युवा मराठा महासंघ या सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष असून,व-हाणे गावी त्यांनी आश्रयआशा फाउंडेशन नावाची संस्था स्थापन करून या संस्थेचे नाव अल्पावधीतच संपूर्ण महाराष्ट्रात परिचीत व नावलौकिक प्राप्त केले.तस बघितले तर राजेंद्र पाटील राऊत यांनी आपल्या कौळाणे सारख्या ग्रामीण भागातून पत्रकारितेची सुरूवात केली. महाराष्ट्रातील विविध वृत्तपत्रांत सेवा करुन आज स्वतः च्या मालकीच्या युवा मराठा वृतपत्र आणि न्युज चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात एक खास ओळख निर्माण केली आहे.राजेद्र पाटील राऊत यांनी सर्वसामान्यांना जवळ करुन मोठे केले,”जे का रंजले गांजले” या उक्तीप्रमाणे राजेंद्र पाटील राऊत यांचे कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे.!

Previous articleमहिला कर्मचारी चालवणार”ड्रोन”आरोपीच्या शोधासाठी होणार उपयोग.
Next articleवानखेड येथे पिण्यासाठी दुषित पाणी पुरवठा ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात, नागरिक संतप्त.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.