आशाताई बच्छाव
हनुमान वार्डात मागेल तिथे काम देऊन निधी उपलब्ध करून दिला.
आमदार डॉ देवरावजी होळी
आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या हस्ते हनुमान वॉर्ड तेली मोहल्यातील ५० लाख रुपयाच्या रस्ता बांधकामांचे लोकार्पण
गडचिरोली,सुरज गुंडमवार ब्युरो चीफ
गडचिरोली शहरातील हनुमान वार्ड व तेली मोहल्यामध्ये आपण विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणामध्ये निधी उपलब्ध करून दिला असून लोकप्रतिनिधी नगरसेवकांनी मागितलेल्या सर्व कामांना आपण निधी उपलब्ध करून दिलाअसल्याचे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी या वार्डातील ४० लक्ष रुपयांच्या रस्ता बांधकामाच्या लोकार्पण प्रसंगी केली
यावेळी प्रामुख्याने भाजपा जेष्ठ नेते रमेशजी भुरसे, शहर अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, माजी नगरसेविका वैष्णवीताई नैताम, शहर महामंत्री केशव निंबोड, माजी नगरसेविका निताताई उंदीरवाडे, देवाजी लाटकर, युमो उपाध्यक्ष प्रतीक राठी, अर्चना निंबोड, नरेश हजारे, शहर महामंत्री विवेक बैस, नीता बैस रश्मी बागमारे, बालाजी भांडेकर, मनोहर भांडेकर, रमेश बोधलकर, शंकर भांडेकर, पद्माकर पिपरे, सुधाकर शेंडे, पुरुषोत्तम गुरनुले, यांचे सह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते व स्थानिक नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.