Home अमरावती निरोगी स्वास्थ्यासाठी नेहमी योग आवश्यक: जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांची आव्हान, आंतरराष्ट्रीय योग...

निरोगी स्वास्थ्यासाठी नेहमी योग आवश्यक: जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांची आव्हान, आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात.

105

आशाताई बच्छाव

1000487206.jpg

निरोगी स्वास्थ्यासाठी नेहमी योग आवश्यक: जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांची आव्हान, आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात.
दैनिक युवा मराठा
पी एन देशमुख..
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.
भावी आंतरराष्ट्रीय योगदान शुक्रवार २१ रोजी सकाळी ७ वाजता विभागीय क्रीडा संकुल येथे उत्साहात साजरा करण्यात आला. आपल्या आरोग्याची काळजी घ्यायची असल्यास योग करणे आवश्यक आहे. योग जीवनाचा अविभाज्य अंग असून निरोगी स्वास्थासाठी नियमित योग करावा, असे आव्हान जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले. प्राचीन भारतीय संस्कृतीने अवद्या जगाला दिलेली एक अमूल्य दिन म्हणजे योग होय. माणसाला अंतर बाह्य निरोगी करून दीर्घ आयुष्य प्रदान करण्याचे सामर्थ्य योगात आहे. आज संपूर्ण जगाने योग्य देशाचा केलेला शिकार हे त्याचेच प्रतीक आहे. जीवन तलाव मुक्त, भयमुक्त आणि निरोगी राहावे. या उद्देशाने आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमाचे आयोजन आयुष मंत्रालय भारत सरकार व महाराष्ट्र शासनाच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी जिल्हा प्रशासन, क्रीडा व युवक सेवा अमरावती विभाग, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, शिक्षणाधिकारी कार्यालय, माहानगरपालिका, राष्ट्रीय छात्र सेना, स्काऊट गाईड शारीरिक शिक्षक संघटना, नेहरू युवा केंद्र महाराष्ट्र योग परिषद, श्री रविशंकर आर्ट ऑफ लिविंग आरोग्य महिला भरती, पतंजली योग समीती. भारत स्वाभिमान ट्रस्ट, युवा भारत किमान पंचायत, वंदे मातरम योग प्रसारक मंडळ व जिल्ह्यातील विविध योग संघटना, खेळ संघटना क्रीडा मंडळ, विविध शाळेतील विद्यार्थी, खेळाडू, युवक युती, नागरिक, अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते. आंतरराष्ट्रीय योग दिनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या हस्ते दीप प्रजलाने झाले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री जोगी साहेब, क्रीडा व युवक सेवा उपसंचालक विजय संतान, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, उपायुक्त समाज कल्याण अधिकारी सुनील वारे, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण माया केदार, शिक्षणाधिकारी देशमुख जिल्हा नियोजन अधिकारी अभिजीत मस्के उपस्थित होते
समाज कल्याण उपयुक्त सुनील वारे व समस्यांचे सहाय्यक आयुक्त माया केदार यांनी उपस्थित त्यांना व्यसनमुक्तीची शपथ आणि स्क्रीन एडिक्शन विषयी मार्गदर्शन केले. योग कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर्ट ऑफ लिविंग चे नीरज अग्रवाल तर आभार प्रदर्शन योगेश राठी यांनी केले तसेच मंचावर योग प्रत्यक्ष कविता मोटवानी पूनम राठी नेहा कापुरे यांनी केले अशी माहिती देण्यात आली.

Previous articleकाँग्रेस पक्षाच्या वतीने महायुती सरकारच्या विरोधात आंदोलन, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चिखल फेकून केला निषेध.
Next articleवैद्यकीय प्रवेश परीक्षा रद्द करून नव्याने परीक्षा घ्यावी – आ. कानडे
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.