
आशाताई बच्छाव
सुरगाव येथील कत्तलखान्याकरिता एक हेक्टर जागा रस्त्यालगतची हस्तांतरित करू नका
वारकरी संप्रदाय तर्फे उमरेड तहसीलदार यांना निवेदन
संजीव भांबोरे
नागपूर- उमरेड तालुक्यातील मौजा सुरगाव येथील गट क्रमांक 16 . 28 हेक्टर आर जाग्यापैकी रस्त्यालगतची एक हेक्टर जागा कत्तलखाण्याकरिता हस्तांतरित करण्यात येऊ नये याबाबतचे निवेदन सांप्रदायिक वारकरी संघटनेच्या वतीने उमरेड येथील तहसीलदार यांना देण्यात आले. याबाबत सविस्तर वृत्त असे की उमरेड तहसील कार्यालयामार्फत जाहीरनामा क्रमांक/रामा क्र/एन एन रा२२/२३-२४ सात जून 2024 च्या पत्रानुसार वारकरी संप्रदाय ग्रामीणच्या वतीने उमरेड कार्यालयामार्फत काढण्यात आलेल्या जाहीरनाम्यावर आक्षेप घेत असल्यामुळे सदर रस्त्यालगतची जागा असल्यामुळे कत्तल खाण्यामुळे जनावराची कटाई होऊन त्यामधून रक्त व मांस निघून लोकांच्या आरोग्यास आणि भारतीय संस्कृतीस हानी होईल .रस्त्याने शाळकरी मुले जाताना त्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतात व आरोग्याच्या प्रश्न निर्माण होऊ शकतो .त्यामुळे उपरोक्त जागा कत्तलखाण्याकरिता हस्तांतरित करण्यात येऊ नये अशा मागणीचे निवेदन तहसीलदार उमरेड यांना
दामोदर म. फाये,शंकर म.कावळे,ओमदेव म.चौधरी नानाजी म. गिरसावडे ,विशापडोळे, हेमंत म. कुबडे, उरकुडे महाराज,सतीश लुटे, कुलदिप गंधे,धीरज गोमासे, विजय सहारे, राहुल शेंडे,लोकेश म. कडवं,उत्तम म. चंदनबावणे, हिरामण डहारे, नारायण बांते,विक्रम लुटे,मयूर ठवकर, कार्तिक इंगळे,कृणाल करमोरे, यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आले. वरील निवेदनाची दखल शासनाने न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे.