Home नाशिक नामपूरला तब्बल 47 वर्षांनी भरली शाळा……

नामपूरला तब्बल 47 वर्षांनी भरली शाळा……

528
0

आशाताई बच्छाव

1000485346.jpg

नामपूरला तब्बल 47 वर्षांनी भरली शाळा……
नामपूर,(प्रतिनिधी वामन शिंदे)-काही वर्षात शाळेतून दहावी बारावी उत्तीर्ण झालेले तरुण नोकरीनंतर व दहा-बारा वर्षांनी एकत्र येत- गेट..टुगेदर राबवण्याची संकल्पना चांगलीच रूढ झाली आहे परंतु नामपुर ला वयाची साठी पार केलेल्या शाळकरी मित्र मे ळाल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले वृद्धत्वाकडे वाटचाल सुरू असूनही हम किसीसे कम नही म्हणणारे शाळकरी मित्र 47 वर्षापूर्वीच्या आठवणीत रममान झाले होते
शिक्षकांनी शाळेत केलेली शिक्षा यशानंतरची शाब्बासकी पाठीमागील बाकावर बसून केलेल्या खोड्या या आठवणींची ग्वाही देत मविप्रचा नामपुर इंग्लिश स्कूलच्या 1977 च्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांची तब्बल 47 वर्षांनी शाळा भरली एकमेकांना ओळखण्याची जणू स्पर्धा यावेळी सुरू होती जिवलग मित्रांच्या सुवर्ण महोत्सवी मेळ्या मुळे मैत्रीची वीण यामुळे अधिक घट्ट झाली मेळाव्याची कल्पना नामपुरचे माजी उपसरपंच राजीव सावंत सौ. कल्पना अलई गुलाब बापू सावंत शशिकांत सावंत जगदीश भावसार पंडित देवरे नामदेव भदाणे, विवेकानंद काकडे, ठाकरे सर, डॉक्टर राजेंद्र मोरे यांनी मांडली त्यानुसार व्हाट्सअप च्या माध्यमातून सर्व माजी विद्यार्थ्यांचा शोध घेत माझी शाळा माझा अभिमान ग्रुप बनविला त्यावेळचे शिक्षक वाय जी पगार बीएम कापडणीस .वी आर कापडणीस सुभाष भदाणे श्री पाठक सर पुष्पा सोनवणे मॅडम आदी सेवानिवृत्त शिक्षक प्रमुख पाहुणे होते अध्यक्षस्थान 83 वर्षाचे श्री बेडसे सर यांनी भूषविले गेल्या 47 वर्षातील प्रगतीचा प्रत्येकाने व्यक्तिगत ओळख सादर केला याप्रसंगी पुष्पा सोनवणे यांनी अत्यंत बहारदार भाषण केले मेळाव्यासाठी 55 विद्यार्थी सात शिक्षक उपस्थित होते सूत्रसंचालन सुभाष कंकरेज यांनी केले

Previous articleविप्र फाउंडेशन शाखा जालना अध्यक्षपदी रामनिवास गौड व सचिवपदी पवन जोशी यांची फेरनिवड तर कोषाध्यक्षपदी नारायण दायमा यांची निवड
Next articleजिजाऊ ज्ञानमंदिरात योग दिन साजरा.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here