Home भंडारा भाऊराव पंचवटे यांनी शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार बऱ्याच प्रमाणात उघड केल्याबद्दल सन्मानपत्र ,पुष्पगुच्छ...

भाऊराव पंचवटे यांनी शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार बऱ्याच प्रमाणात उघड केल्याबद्दल सन्मानपत्र ,पुष्पगुच्छ ,वृक्ष भेट देऊन सन्मानित

285

आशाताई बच्छाव

1000481319.jpg

भाऊराव पंचवटे यांनी शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार बऱ्याच प्रमाणात उघड केल्याबद्दल सन्मानपत्र ,पुष्पगुच्छ ,वृक्ष भेट देऊन सन्मानित

 

भंडारा-प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस व अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संजीव भांबोरे यांच्या वाढदिवसाचे औचिप्त साधून भाऊराव पंचवटे राह. कोसरा- कोंढा,तह.पवनी,जिल्हा. भंडारा. यांचा सन्मानपत्र, पुष्पगुच्छ ,वृक्ष भेट देऊन कोंढा येथे सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्यासोबत देशोन्नतीचे पत्रकार व प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे पवनी तालुका अध्यक्ष प्राध्यापक प्रेमानंद हटवार यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.भाऊराव पंचवटे हे सण २००६ पासून कोंढा कोसरा येथे राहत आहेत.फरवरी २००६ मध्ये डॉ.अरुण मोटघरे महाविद्यालय, कोंढा कोसरा,येथे कनिष्ठ लिपिक म्हणून रुजु झाले.परंतु या महाविद्यालयाचे प्राचार्य तथा संस्था अध्यक्ष अरुण मोटघरे हे शासनाकडून आर्थिक लाभ मिळविण्याकरिता बनावट उत्पनाचे प्रमाण पत्र व इतर बनावट कामे करायला सांगायचे.तसेच वारंवार संस्था अध्यक्ष तथा प्राचार्य हे पैश्याची मागणी करायचे याला भाऊराव पंचवटे यांनी विरोध केला त्यामुळे यांच्यावर खोटे व बनावटी आरोप लावुन संस्थेनी चौकशी समिती गठीत करून दि.१५/१०/२०१९ सेवेतून बडतर्फ केले.आता हे प्रकरण मुंबई हायकोर्ट च्या नागपूर खंडपीठात चालू आहे. व हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.सेवेतून बडतर्फ केल्या नंतर श्री.भाऊराव पंचवटे यांनी स्व.श्री.लक्ष्मणजी मोटघरे चॅरिटेबल ट्रस्ट,नागपूर व ज्ञानेश्वरजी मेंघरे बहुउद्देशीय शिक्षण संस्था नागपूर,ह्या दोन्ही संस्थे चे अध्यक्ष अरुण मोटघरे आहेत.आणि सचिव यांच्या पत्नी सौ.सुजाता मोटघरे आहेत.या दोन्ही संस्थेद्वारा संचालित भंडारा जिल्ह्यातील कोंढा कोसरा व लाखांदूर मध्ये रा.तु.म.नागपूर विद्यापीठ द्वारा संलग्नित तसेच गडचिरोली जिल्ह्यातील वडसा(देसाईगंज),कोरेगाव, विहिरगाव,कुरखेडा येथे गोंडवाना विद्यापीठ,गडचिरोली द्वारा संलग्नित बरेचसे अभ्यासक्रम चालविलेल्या जात आहेत.या दोन्ही संस्थेद्वारा सुरू असलेल्या संपूर्ण अभ्यासक्रम मध्ये B.A.कोंढा कोसरा चे हे अनुदानीत अभ्यासक्रम सोडून बाकीच्या संपूर्ण अभ्यासक्रम ला मान्यताप्राप्त शिक्षक नाहीत.भौतिक सुविधा नाहीत.वर्षभर विद्यार्थी कॉलेज ला येत नाहीत. झिरो अटेंडनस वर प्रवेश दिल्या जातो. व ७५% प्रेझेंटी नसताना सुद्धा विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती चे आवेदन फॉर्म भरून करोडो रुपयाचे शिक्षण शुल्क व इतर शुल्क चे अपहार केले आहे.या बाबद विद्यापीठ,समाजकल्याण व इतर संबंधित प्रशासनाला वारंवार तक्रार देवून प्रकरण उघडकीस आणले.त्याच बरोबर भंडारा जिल्ह्यातील संपूर्ण कॉलेजच्या परीक्षा केंद्रावर सर्रास कॉपी चालायची त्यामुळे जिल्ह्यातील उच्च शिक्षणाचा दर्जा खालावला होता. याबाबद सुद्धा श्री.भाऊराव पंचवटे यांनी नागपूर विद्यापीठाला तक्रार देवून हे प्रकार लक्षात आणून दिले.त्यामुळे विद्यापीठानी जातीने लक्ष देवून भरारी पथक नेमुन परीक्षेमध्ये पारदर्शिक्ता आणलेली आहे.त्यामुळे नक्कीच जिल्ह्यातील उच्च शिक्षणाचा दर्जा सुधारेल.तसेच करोडो रुपयाचा शिष्यवृत्ती घोटाळा सुद्धा यांनी लक्षात आणून दिला असून बनावट TC तयार करून प्राचार्य पदावर नियुक्ती झालेले प्रकरण सुद्धा उघडकीस आणले आहे.

Previous articleचंद्रशेखर खोब्रागडे समाजसेवा पुरस्काराने सन्मानित
Next articleपुण्यात रंगला प्रसाद खैरे आयोजित बालाजी इव्हेंट आणि एंटरटेनमेंट प्रस्तुत इंडिया फॅशन फेस्ट 2024 चा सोहळा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.