
Yuva maratha news
परळीत प्रियकराला विष पाजून केली हत्या ग्रामीण पोलिसात आठ जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल
मोहन चव्हाण
ब्युरो चीफ बीड जिल्हा
बीड/परळी दि: ०६ जून २०२४ रोजी एका महिला प्रेयसीसोबत प्रेम संबंध बिघडल्यामुळे प्रियकर आणि प्रियसी यांच्यात झालेल्या वादानंतर धर्मापुरी फाट्या जवळील एका शेतातील आखाड्यावर या प्रियकराला बोलावून दिनांक ०६ जून गुरुवार रोजी त्याला जबर मारहाण करून विष पाजून त्याची हत्या करण्यात आली. अशी माहिती परळी ग्रामीण पोलिसांकडून मिळाली आहे. याप्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात आठ जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारुती भरत चौधरी वय ३२ वर्ष रा. कारबेटवाडी ता. सोनपेठ जि. परभणी असे मयत प्रियकराचे नाव आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मारुती चौधरी याचे आपल्या प्रेयसी सोबत काही कारणांवरून भांडण झाले. याचा राग मनात धरून प्रेयसीने आज मारुती चौधरी याला परळी येथील धर्मापुरी फाट्याजवळील एका शेत आकड्यावर बोलावून घेतले. व त्यानंतर सात जणांच्या मदतीने त्याला जबर मारहाण करून बळजबरीने विष पाजले. त्यानंतर अत्यावश्य अवस्थेत काही नागरिकांनी त्याला अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी शेषेराव भरत चौधरी वय २७ वर्षे रा. कार्बेटवाडी ता. सोनपेठ जि. परभणी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यशवंत मनोहर देवकते, प्रियंका प्रभाकर चौधरी, सोनेराव मनोहर देवकते, कृष्णा श्रीरामे, नाईकवाडे (पूर्ण नाव माहित नाही), गौरव (पूर्ण माहित नाही) सर्व रा. बुक्तरवाडी ता. सोनपेठ जि. परभणी या आठ आरोपी विरुद्ध परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात कुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कवडे हे करत आहेत.