Home अमरावती अमरावतीत काँग्रेसचे बळवंत वानखडे यांचा विजय तर भाजपाचे नवनीत राणा यांचा पराभव,...

अमरावतीत काँग्रेसचे बळवंत वानखडे यांचा विजय तर भाजपाचे नवनीत राणा यांचा पराभव, बच्चू कडू यांच्या उच्च उमेदवाराने रानाचे विजयाचे स्वप्न भंगविले.

90
0

आशाताई बच्छाव

1000431070.jpg

अमरावतीत काँग्रेसचे बळवंत वानखडे यांचा विजय तर भाजपाचे नवनीत राणा यांचा पराभव, बच्चू कडू यांच्या उच्च उमेदवाराने रानाचे विजयाचे स्वप्न भंगविले.
दैनिक युवा मराठा.
पी.एन.
देशमुख
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती
अमरावती लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे बळवंत वानखडे विजय झाले आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी जवळपास पूर्ण झालेली असून निवडणूक अधिकाऱ्यांनी वानखडे यांची घोषणा विजयी म्हणून केलेली आहे. निवडणूक पूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नवनीत राणा यांना पराभवाचा फटका बसला आहे. महाराष्ट्रातील हिंदू शेरनी म्हणून नवनीत राणांचा उल्लेख त्यांचे पती रवी राणा यांनी केला होता. तर तेलंगणातील हैदराबाद मध्ये असुद्दीन ओवेसीच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या माधवी लता यांचाही पराभव झाला आहे. निवडणूक प्रचारात माधवी लता यांची ही प्रतिमा हिंदू चरणी म्हणून प्रमोद करण्यात आली होती. खासदार नवनीत राणा यांनी त्यांच्यासाठी हैदराबाद मध्ये प्रचार केला. त्यावेळी हल्लाबोल करताना त्यांनी हिंदू व जय श्रमाच्या मध्यावर हिंदू या शब्दाने हल्लाबोल केला होता. मात्र जनतेने मतदान रूपाने त्यांना प्रतिउत्तर दिले. खासदार नवनीत राणा यांनी त्यांच्यासाठी हैदराबाद मध्ये प्रचार केला होता परंतु मतदारांनी भाजपचे उमेदवार नवनीत राणा यांचा पराभव केला. भारतीय जनता पक्षाने नवनीत राणा यांना स्टार प्रचारक म्हणून संपूर्ण राज्यात प्रचारासाठी पाठवले. विशेष करून नवनीत राणा यांनी ओवैसी यांच्यावर केलेली टीका असो की प्रत्येक मतदारसंघात त्यांनी हिंदुत्ववादी केलेले भाषण असतील त्यामुळे अधिक प्रचाराला आल्या होत्या. परंतु काँग्रेसचे बळवंत वानखडेहे४९३५१०+१९४५६ मतांनी विजयी झाले. भाजपचे नवनीत राणा ४७४०५४+१९४५६ मते घेऊन यांना पराभव पत्करावा लागला. तर बच्चू कडू यांच्या प्रहार-अपक्ष म्हणून दिनेश भाऊ यांनी ७९४४५+४१४०६५ मते घेऊन पराभव पत्करावा लागला. अमरावती लोकसभा मतदारसंघात महायुतीचा घटक पक्ष असलेला प्रहार या पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी सुरुवातीपासून नवनीत राणांना विरोध दर्शविला. त्यामुळे कडू यांनी दिनेश बुब नावाचे कार्यकर्ते उभे केले. त्यांनी देखील ७६ हजाराचे मतदान घेतल्याने नवनीत राणा यांचा विजय कडील मार्ग बंद केला. तर काँग्रेस उमेदवार वानखडे यांचा विजय झाला. या परवा पराभवाचे कारण मानले जाते.

Previous articleरायगड लोकसभा मतदार संघातुन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ( अजित पवार गट )चे सुनील तटकरे ८२ हजार ७८४ मतांनी विजयी
Next articleकठोर मेहनतीच्या व जिद्दीच्या बळावर पारस राठोडनी मिळवले यश.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here