Home रायगड रायगड लोकसभा मतदार संघातुन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ( अजित पवार गट )चे...

रायगड लोकसभा मतदार संघातुन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ( अजित पवार गट )चे सुनील तटकरे ८२ हजार ७८४ मतांनी विजयी

92
0

आशाताई बच्छाव

1000431023.jpg

रायगड लोकसभा मतदार संघातुन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ( अजित पवार गट )चे सुनील तटकरे ८२ हजार ७८४ मतांनी विजयी

युवा मराठा न्यूज रायगड / पेझारी प्रतिनिधी :- मुजाहीद मोमीन

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ मध्ये ३२ रायगड लोकसभा मतदार सांगतुन राष्ट्रवादी पार्टी ( अजित पवार गट ) चे उमेदवार सुनील तटकरे ८२ हजार ७८४ मतांनी विजय झाले.
त्यांनी निकटचे प्रतीस्पर्धी शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) गटाचे उम्मेदवार अनंत गीते यांना पराभूत करून विजय मिळवला.
जिल्हा क्रीडा संकुल, नेहूली तालुका अलिबाग येथील मतमोजणी केंद्रावर आज सकाळी ०८:०० वाजता प्रत्यक्षात मतमोजणी सुरु झाली, २९ फेऱ्यांमध्ये ही मतमोजणीची प्रक्रिया शांततेत पूर्ण झाली.

लोकसभा निवडणुकीत मतमोजणी झालेल्या एकूण १० लाख १३ हजार २७२ मतांपैकी उमेदवारनिहाय मिळालेली मते पुढीलप्रमाणे आहेत.

१) श्री. अनंत गंगाराम गिते, ( शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे ) – ४२५५६८ मते
२) श्री. सुनील दत्तात्रेय तटकरे, ( राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टी – अजित पवार गट ) – ५०८३५२ मते
३) श्री. कुमोदिनी रवींद्र चव्हाण, ( वंचित बहुजन आघाडी ) – १९६१८ मते
४) श्री. श्रीनिवास सत्यनारायण मट्टपरती, ( अपक्ष ) – ९३९४ मते
५) श्री. अमित श्रीपाल कवाडे, ( अपक्ष ) – ५६३४ मते
६) श्री. अनंत बालोजी गिते, ( अपक्ष ) – ३५१५
७) श्री. नितीन जगन्नाथ मयेकर, , ( अपक्ष ) – २५६० मते
८) श्री. पांडुरंग दामोदर चौले, ( अपक्ष ) – २४१७ मते
९) श्री. अनंत पद्मा गिते, ( अपक्ष ) – २०४० मते
१०) श्री. प्रकाश बाळकृष्ण चव्हाण, ( भारतीय जवान किसान पार्टी ) – १९३९ मते
११)श्री. मंगेश पद्माकर कोळी, ( अपक्ष ) – १८२० मते
१२) श्री. अजय यशवंत उपाद्ये, ( अपक्ष ) – १७९५ मते
१३) श्रीमती. अंजली अश्विन केळकर, ( अपक्ष ) – १३५० मते
१४) नोटा – २७ हजार २७० मते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here