आशाताई बच्छाव
दैनिक माहाभूमीच्या प्रतिनिधींची माहोरा येथे बैठक संपन्न
माहोरा प्रतिनीधी-मुरलीधर डहाके
याविषयी अधिक वृत्त असे की, आज दिनांक 05/05/2024 रोजी दैनिक माहाभूमी या वृत्तपत्राचे मुख्य संपादक तथा अदिती अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे सर्वेसर्वा मा. सुरेशजी देवकर सर यांच्या अध्यक्षतेखाली माहोरा येथे दैनिक माहाभूमीच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला दैनिक महाभूमीचे कार्यकारी संपादक श्री ब्रह्मानंद जाधव तसेच त्यांचे सहकारी श्री वैद्य सर, यासोबतच अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे प्रदेश संपर्कप्रमुख मा.श्री वसंतराव देशमुख, अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे जालना जिल्हाध्यक्ष श्री कृष्णा लहाने, अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे जाफराबाद तालुका अध्यक्ष श्री मुरलीधर डहाके, श्री विजय डहाके उपस्थित होते.
यावेळी उपस्थित दैनिक माहाभूमीच्या पत्रकारांना मा.वसंतराव देशमुख प्रदेश संपर्कप्रमुख यांनी मार्गदर्शन केले.मुख्य संपादक मा.सुरेशजी देवकर सर यांनी दैनिक माहाभूमीच्या प्रतिनिधींना संबोधित केले.यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, बातमी लिहितांना पत्रकारांनी बारीक विचार करूनच बातम्यांच संकलन करावं जेनेकरुन कोणाबद्दल आकस भावना निर्माण होणार नाही याचं भान ठेवूनच बातम्या प्रसिद्ध झाल्या पाहिजे असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केले आहे.
या बैठकीत दैनिक माहाभूमीच्या उपसंपादक पदी मा.श्री वसंतराव देशमुख यांची निवड करण्यात आली असून ही निवड मुख्य संपादक तथा आदिती अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे सर्वेसर्वा अध्यक्ष मा.सुरेश देवकर सर यांनी केली.यासोबतच दैनिक माहाभूमीचे जाफराबाद तालुका प्रतिनिधी ग्रामीण साठी मा.कृष्णा लहाने यांची तर जाफराब तालुका प्रतिनिधी शहर यासाठी मुरलीधर डहाके यांची निवड करण्यात आली.यांच्या या निवडीमुळे सर्व दैनिक माहाभूमीच्या प्रतिनिधींचे सर्व स्तरातील लोकांनी अभिनंदन केले आहे.