Home भंडारा अवैध दारू विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या विरुद्ध कठोर कायदा करा

अवैध दारू विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या विरुद्ध कठोर कायदा करा

182

Yuva maratha news

1000319549.jpg

अवैध दारू विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या विरुद्ध कठोर कायदा करा

अंधश्रद्धा निर्मूलन समिती मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन सादर

संजीव भांबोरे
भंडारा ( जिल्हा प्रतिनिधी)अवैध दारू विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या विरुद्ध कठोर कायदा करण्यात यावा. याबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवासी जिल्हाधिकारी स्मिता बेलपात्रे यांच्यामार्फत दिनांक 27 एप्रिल 2024 रोजी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती मार्फत विष्णुदास लोणारे यांच्या नेतृत्वात निवेदन पाठविण्यात आले. पाठविण्यात आलेल्या निवेदनात अवैध दारू विक्री करणाऱ्या व्यक्ती विरुद्ध सध्या महाराष्ट्र राज्यात कायदा आहे .परंतु या कायद्यामुळे दारू विक्री करणाऱ्या व्यक्तीवर वचक बसत नाही. दबाव पडत नाही. त्यामुळे गल्लोगल्ली, खेड्यापाड्यात, खुलेआम अवैध दारू विक्रीचे व्यवसाय सुरू आहे. त्यामुळे लहान लहान मुले दारूच्या आहारी जाऊन त्यांचे कुटुंब उध्वस्त होत आहेत. लहान लहान मुलेचे जीवन बरबाद होत आहेत. मुले व्यसनाधीन होतात. दारूच्या नशेत मारामाऱ्या करून खून करण्यासारख्या घटना समाजात घडत आहेत. त्यामुळे समाजात गुन्हेगारीचे प्रमाण वाढतात ही चिंतेची बाब असून समाजासाठी व देशासाठी धोक्याची बाब आहे. म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती चे बुवाबाजी विभागाचे राज्य सहकार्य वाह विष्णुदास लोणारे, नितेश बोरकर, सामाजिक कार्यकर्ता सुरज परदेशी, चंद्रशेखर खोब्रागडे , सौ .कविता लोणारे ,त्रिवेणी वासनिक, अश्विनी भिवगडे, सुषमा बनसोड, यांनी निवेदन दिले की महाराष्ट्रात सध्या असलेल्या दारूबंदी कायद्यात सुधारणा करून त्यात दारू विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी पकडले कि त्या दारू विक्रेत्यानी एक लाख रुपयाची जमानत नगद किंवा सालवंशी दिल्याशिवाय सोडण्यात येऊ नये . गुन्हा सिद्ध झाल्यास त्या व्यक्तीला ,7 वर्षा पर्यंतची कठोर कारवाची शिक्षा व्हावी. आणि 2 लाख रुपये आर्थिक दंड व्हावा किंवा दोन्ही शिक्षाची तरतूद महाराष्ट्रातील दारूबंदी कायद्यात करावी. अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे .

Previous articleजिंतूर तालुक्यात लोकशाही बळकट करण्यासाठी नवरदेव नवरीचे मतदान
Next articleप्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या राज्य कोष्याध्यक्ष पदी तिसऱ्यांदा लक्ष्मण कांबळे यांची फेर निवड
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.