Yuva maratha news
संस्कार शिबिर म्हणजे राष्ट्र निर्मितीची संकल्पना – देवचंद चौधरी
संत शिवराम महाराज उच्च प्राथमिक शाळेत सुसंस्कार शिबिर समारोप
संजीव भांबोरे
भंडारा जिल्हा प्रतिनिधी : शालेय जीवनात विद्यार्थी -विद्यार्थींनींना आदर्श दिनचर्या, आई -वडिल व गुरूंजनांचा आदर करण्यास प्रोत्साहन देणे. देशाची भावी पिढी सुसंस्कारित घडावी, उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये शैक्षणिक शिक्षणा व्यतिरिक्त जीवन शिक्षणाचे आदर्श धडे विद्यार्थ्यांना देऊन आदर्श नागरिक घडविणे गरजेचे आहे. म्हणून संस्कार शिबिर म्हणजे राष्ट्र निर्मितीची संकल्पना होय असे प्रतिपादन संत शिवराम महाराज उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक देवचंद चौधरी यांनी केले.
ते भंडारा येथील संत शिवराम महाराज उच्च प्राथमिक शाळा व माध्यमिक विद्यालयाच्या वतीने विद्यालयाच्या प्रांगणात व्यक्तिमत्व विकास सुसंस्कार शिबिराच्या समारोपीय कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संत शिवराम महाराज उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक देवचंद चौधरी होते. प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते विलास केजरकर, खोकरला पतंजलि योग समितीचे अध्यक्ष यशवंत बिरे, माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अर्चना भोयर इत्यादी शिक्षक -शिक्षिका उपस्थित होत्या.
बालसंस्काकर शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थी -विद्यार्थींनींना आदर्श जीवनाची कला, आत्मसंरक्षण, नेतृत्व क्षमता, एकीचे बळ यांचे धडे देण्यात आले असे प्रतिपादन संत शिवराम महाराज उच्च प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना भोयर यांनी केले.
त्यावेळी यशवंत बिरे यांनी शाळेसाठी तयार केलेल्या क्षणचित्रांचे विमोचन करण्यात आले. व शाळेच्या वतीने पाहुण्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
सात दिवशीय शिबिरा दरम्यान गोस्वामी यांनी हस्ताक्षर, सामान्य ज्ञान, चित्रा वैद्य ( हटवार) चित्रकला, माधवी चिखलीकर, मंगला डहाके -बोधकथा, पुरण लोणारे – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, प्रणित उके -नृत्य प्रशिक्षण, विलास केजरकर -संस्कारमय गिते, यशवंत बिरे यांनी योग- प्राणायाम यांचे महत्त्व. तसेच उपस्थित मान्यवरांनी विविध मार्मिक उदाहरण देऊन मार्गदर्शन केले.
शिबिरात शाळेतील जवळपास १०० पेक्षा जास्त विद्यार्थी – विद्यार्थींनींनी या शिबिरात सहभागी झाले होते. बाल संस्कार शिबिराचे मनोगत शुभ्रा सोमनाथे व श्रावणी गोखले यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिल्पा आचले व प्रास्ताविक रंजना भिवगडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार शिबिर प्रमुख पार्वती बिसने यांनी मानले.
शिबिराच्या यशस्वीतेकरिता या कार्यक्रमाला संजय पडोळे, ज्योती ऊके, अल्का हटवार, मंगला मेहर, धीरज बान्ते, गंगाधर भदाडे, शेखर बोरकर, रजनी सेलोकर, सुरेश गोंदोळे, नलिनी बिरे, दारासिंग चव्हाण, राधिका बान्ते, वर्षा साखरे, प्रमिला गिऱ्हेपुंजे, कुसूम सार्वे, माया वैद्य, रंजना चाचेरकर, ज्योती उके, कु. तनस्वी राघोर्ते, प्रियश लोणारे, संकेत आजबले, नयन पडोळे, शाक्य मेश्राम, अक्षरा नागदेवे, प्रज्वल घरडे, वंश गजभिये, पारस सुखदेवे, कार्तिक कठाणे, सोम्या गजठाणे, शुब्रा सोमनाथे, गुंजन मारबते इत्यादी शाळेतील शिक्षक -शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी -विद्यार्थींनींनी मोलाचे सहकार्य केले.