Home नांदेड भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्य सलग आठरा तास वाचन उपक्रम संपन्न.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्य सलग आठरा तास वाचन उपक्रम संपन्न.

161

आशाताई बच्छाव

1000282199.jpg

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्य सलग आठरा तास वाचन उपक्रम संपन्न.

देगलूर तालुका प्रतिनिधी, (गजानन शिंदे)

देगलूर :– अडत व्यापारी शिक्षण संस्था संचलित देगलूर महाविद्यालयातील ग्रंथालय विभाग व श्री समर्थ वाचनालय, देगलूर यांच्या संयुक्त विद्यमाने एम ओ यू अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी सलग 18 तास वाचन या उपक्रमाचे आयोजन देगलूर महाविद्यालयाच्या ग्रंथालयात करण्यात आले.
प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षतेस्थानी अडत व्यापारी शिक्षण संस्थेचे सहसचिव श्री सुर्यकांत नारलावार होते. प्रमुख पाहुणे समर्थ वाचनाएलयाचे सचिव अविनाश देसाई हसनाळकर व कोषाध्यक्ष देवेंद्र मोतेवार तसेच देगलूर महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. मोहन खताळ, उपप्राचार्य डॉ. अनिल चिद्रावार, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. उत्तमकुमार कांबळे पर्यवेक्षक प्रा. संग्राम पाटील, डॉ. बालाजी कत्तुरवार, ग्रंथपाल, डॉ. साईनाथ शिंदे, सहायक ग्रंथपाल श्रीनिवास नाईक, समर्थ वाचनालयाचे ग्रंथपाल पुंडलिक कदम, दीपक संगमकर, बालाजी गोविंदवार, ईळेगावकर रेखा व महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून मतदानाची शपथ देण्यात आली.
दिनांक 12/04/2024 रोजी सकाळी 05:00 पासून रात्री 11:00 वा. पर्यन्त विद्यार्थ्यांनी सलग 18 तास वाचन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. या उपक्रमात एकूण 53 विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांना अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

Previous articleपावणे दोन वर्षांत घेतलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकांमध्ये सामान्य जनतेच्या हिताचे लोकाभिमुख निर्णय- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Next articleमैत्री ही आयुष्याची शिदोरी असते
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.