Home सामाजिक वटपौर्णिमा

वटपौर्णिमा

203

आशाताई बच्छाव

IMG_20240321_191000.jpg

वटपौर्णिमा

मला लहानपणी माझी आई सावित्री आणि सत्यवानाची कथा सांगायची.ती कथा मला आकर्षित करीत असे.परंतु मनात अनेक प्रश्न सुध्दा उद्भवत असत.माझी आई सांगायची की, वटपौर्णिमेला लग्न झालेल्या बायका वडाची पूजा करतात.ज्यामुळे त्यांना अखंड सौभाग्यवती होण्याचा आशिर्वाद मिळतो.परंतु माझ्या मनाला त्यावेळीही हे पटत नसे.खरंच वडाची पूजा केल्याने बायकांना अखंड सौभाग्य प्राप्त होतं का? हा प्रश्न मी मोठी झाल्यावरही मनात रुंजी घालत असे.
माझे लग्न झाले तेव्हा मी २३वर्षांची होते.त्यावेळी आम्ही अहमदनगरला स्थायिक झालेले होतो.मी,माझे मिस्टर आणि सासूबाई असे तिघे आम्ही राहत असू. सासरची मंडळी फारच धार्मिक वृत्तीची.मला मात्र या वातावरणाची सवय नव्हती.माझ्या माहेरी फारसे सोवळे ओवळे पाळण्याची सवय मला नव्हती.इथे मात्र अगदीच वेगळे होते.लग्नानंतर एक महिन्याने वटपौर्णिमा आली.मला वडाला पूजने वगैरे काही पटत नव्हते.त्यातही असं केल्याने नव-याला दिर्घायुष्य मिळतं हे तर अगदी थोतांड वाटायचं.परंतु सासुबाई काय म्हणतील जर उपवास केला नाही तर आणि वडाला पूजले नाही तर या विचाराने मनात नसतानाही मी जायचे ठरवले.मनात सत्यवान,सावित्री आणि यमराज यांची कथा आठवत पूजा उरकली.
मी पुढेही अशा अनेक वटपौर्णिमा साज-या केल्या.त्यावेळीही मनात याचा उपयोग काय हाच प्रश्न मनात येत असे.दोन वर्षांपूर्वी आलेली करोनाची लाट खूप भयंकर होती.
कितीतरी सत्यवान आपल्या सावित्रीपासून, मुलाबाळांपासून दूर गेले.कितीतरी सावित्र्या आपल्या नव-यांना परत कधीही पाहू शकणार नाही.काही भाग्यशाली बायका आपल्या नव-यांचे प्राण यमराजकडून वापस आणू शकल्या.त्यावेळी मी काही पुरूष मंडळींना हातात पूजेची थाळी घेऊन वडाची पूजा करतात पाहिले.ही पुरूष मंडळी आपली बायको,आई,बहिण यांचे प्राण वाचावे याकरीता वडाची पूजा करायला आल्याचे पाहिले.
ही गोष्ट मी जेव्हा माझ्या नव-याला सांगितली तेव्हा माझे यजमान म्हणाले,”वडाची पूजा करून सावित्री फक्त आपल्या पतीचेच रक्षण नाही करत तर ती आपले सासू – सासरे,आई- वडील,आपल्या घरातील माणसांच्या दिर्घायुष्यासाठी वर मागत असते.तुला नसेल वडाची पूजा करायची तर राहू दे.माझी कुठलीही जबरदस्ती नाही.नसेल पटत तुला या गोष्टी तर जाऊ दे.तसंही मनाविरुद्ध तू काही करावे असे मला वाटत नाही.”
माझ्या यजमानांनी मला समजून घेतले याबद्दल मला खूप बरे वाटले.मला पटायला लागले की आजही सत्यवान आणि सावित्री या जगात आहेत आणि ती एकमेकांच्या दिर्घायुष्याची प्रार्थना करतात.माझ्या मनाला पडलेल्या प्रश्नाचे उत्तर माझ्या यजमानांकडून मला मिळाले होते.त्यात एकमेकांना समजून घेणे महत्त्वाचे आहे हे समजले.माझे विचार आता बदलले आणि मीच मला ओलांडले.

लैलेशा भुरे
नागपुर

Previous articleE.P.S.95, पेंशन संघर्ष समितीची अमरावती येथे सभा संपन्न.
Next articleसंचमान्यता निकष निश्चित करणे बाबतचे निफाड निवासी तहसीलदार राहुल मुळीक यांना निवेदन —
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.