Home उतर महाराष्ट्र खोटे गुन्हे मागे घ्या अन्यथा सकल मराठा समाज तीव्र आंदेलन करणार

खोटे गुन्हे मागे घ्या अन्यथा सकल मराठा समाज तीव्र आंदेलन करणार

72
0

आशाताई बच्छाव

IMG_20240321_081454.jpg

खोटे गुन्हे मागे घ्या अन्यथा सकल मराठा समाज तीव्र आंदेलन करणार
श्रीरामपूर(प्रतिनिधी दिपक कदम)- मराठा आरक्षण मिळावे म्हणून टाकळीभान येथे झालेल्या रास्तारोकोनंतर सकल मराठा समाज बांधवांवर खोटे गुन्हे दाखल झाल्याने संतप्त झालेल्या श्रीरामपूर शहर व तालुक्यातील समाज बांधव व वरील संघाने उपविभागीय अधिकारी किरण सावंत यांना निवेदन देत गुन्हे मागे घेण्याची मागणी केली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, मराठा समाजाला आरक्षण मिळावे, सगसोयरे अध्यादेशाचे रुपांतर कायद्यात करावे या मागणीसाठी मागील आठवड्यात सकल मराठा समाजाने टाकळीभान येथे रास्तारोको केला होता. हा रास्तारोको करताना पोलीस स्टेशन, महसुल प्रशासन यांची रितसर परवानगी घेण्यात आली होती. परवानगी घेतल्यानंतर सदर रास्तारोको करण्याता आला होता. त्यावेळी १४४ कलम लागू असल्याबाबत कोणतीही पुर्वसुचना किंवा तशी नोटीस आंदोलकांना देण्यात आली नव्हती. त्यामुळे श्रीरामपूर शहर व तालुक्यातील मराठा समाज बांधवांनी आक्रमक होत प्रशासकीय भवन येथे उपविभागीय अधिका-यांची भेट घेत निवेदन दिले.
सकल मराठा समाज शांततेने स्वतःच्या न्यायहक्कसाठी गेल्या अनेक वर्षांपासून लढत आहे. लाखोंच्या संख्येने शांततेत निघालेले ५८ मोर्चे, अनेक आंदोलने, हक्काची आरक्षण लढाई लढताना कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. आताही झालेल्या रास्तारोको मध्येही प्रशासकीय अधिका-यांना हवे असलेले सहकार्य मराठा समाज बांधवांनी केले. तरीही चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल झालेले गुन्हे मागे न घेतल्यास सकल मराठा समाज तीव्र आंदोलन करणार असल्याचे समाज बांधवांनी जाहीर केले.

Previous articleगृहिणी (घरातील कामांची जबाबदारी सगळ्यांची)
Next articleनाशिक शहरात सात दिवसांपासून सिटीलिंक बससेवा ठप्प जनसामान्यांचे हाल!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here