Home नाशिक ॲड विनया नागरे (बन्सोड) यांची भारत सरकारच्या नोटरीपदी नियुक्ती!

ॲड विनया नागरे (बन्सोड) यांची भारत सरकारच्या नोटरीपदी नियुक्ती!

164

आशाताई बच्छाव

IMG_20240320_184511.jpg

ॲड विनया नागरे (बन्सोड) यांची भारत सरकारच्या नोटरीपदी नियुक्ती!
नाशिक,(सुदर्शन बर्वे प्रतिनिधी)- येथील प्रथितयश ॲड विनया नागरे बन्सोड यांची भारत सरकारच्या नोटरीपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
ॲड विनया नागरे बन्सोड या विविध सामाजिक संस्था व संघटनावर तज्ज्ञ मार्गदर्शक व कायदेशीर सल्लागार म्हणून कार्यरत आहेत.त्यांनी एका संस्थेच्या माध्यमातून लहान व निराधार मुलांना दत्तक घेण्याचे देखील कार्य चालविलेले आहे.ॲड विनया नागरे बन्सोड युवा मराठा न्यूजच्या नाशिक प्रतिनिधी म्हणून तर युवा मराठासाठी विभागीय कायदेशीर सल्लागार पदावर कार्यरत आहेत.भारत सरकारने नुकतेच ॲड विनया नागरे बन्सोड यांना नोटरीपदी नियुक्ती देऊन त्यांच्या कार्याचा सन्मानच केला असल्याच्या भावना अनेकांनी व्यक्त केल्यात.तर ॲड विनया नागरे बन्सोड यांना याकामी त्यांचे पती अमित नागरे आणि सासू,सासरे व वकील संघाचे पदाधिकारी व नाशिक शहरातील सुप्रसिद्ध ॲड अजित पाटील यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले.

Previous articleजिल्हा परिषद केंद्रीय शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न.
Next articleशेततळ्यात बुडून दोघ्या सख्ख्या भावांचा मृत्यू.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.