Home नांदेड देगलूर महाविद्यालयातील चार खेळाडूंचा अखिल भारतीय आंतर विद्यापीठीय बॉल बॅडमिंटन स्पर्धेत सहभाग.

देगलूर महाविद्यालयातील चार खेळाडूंचा अखिल भारतीय आंतर विद्यापीठीय बॉल बॅडमिंटन स्पर्धेत सहभाग.

166

आशाताई बच्छाव

IMG_20240320_085701.jpg

देगलूर महाविद्यालयातील चार खेळाडूंचा अखिल भारतीय आंतर विद्यापीठीय बॉल बॅडमिंटन स्पर्धेत सहभाग.

देगलूर तालुका प्रतिनिधी, (गजानन शिंदे )

अण्णा विद्यापीठ,चेन्नई येथे होणाऱ्या आंतर विद्यापीठीय बॉल बॅडमिंटन (महिला)स्पर्धेसाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडच्या संघात देगलूर महाविद्यालय, देगलूर चे चार खेळाडू इंगोले सृष्टी, गुजलवाड मयुरी,इंगोले वैष्णवी व सूर्यवंशी पल्लवी या चार मुलींचे निवड झाली आहे.या विद्यापीठीय संघाचे प्रशिक्षण शिबिर दि.11/03/2024 ते दि.18/03/2024 दरम्यान महाविद्यालयाच्या मैदानात संपन्न झाला असून या महिला संघास शुभेच्छा देतेवेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर , कुलसचिव डॉ. शशिकांत ढवळे ,व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. सूर्यकांत जोगदंड , क्रीडा संचालक डॉ. मनोज रेड्डी विद्यापीठीय संघाचे प्रशिक्षक म्हणून डॉ दिलीप भडके तर सहाय्यक प्रशिक्षक कांबळे मधुकर हे आहेत,या खेळाडूंचे महाविद्यालयीन प्रशिक्षक म्हणून डॉ. निरजकुमार उपलंचवार व प्रा.वावधाने दिपक, प्रा.सिताराम हाके यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
या खेळाडूंचे अडत व्यापारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाटील बेंबरेकर, सचिव शशिकांत चिद्रावार ,उपाध्यक्ष नारायणराव मैलागीरे, सहसचिव सुर्यकांत नारलावार, कोषाध्यक्ष विलास तोटावार व कार्यकारिणी मंडळ सदस्य राजकुमार महाजन, डॉ कर्मवीर उंग्रतवार , जनार्दन चिद्रावार ,गंगाधर जोशी, रवींद्र अप्पा द्याडे. देवेंन्द्र मोतेवार , चंद्रकांत नारलावार,प्राचार्य डॉ. मोहन खताळ ,ऊपप्राचार्य डॉ अनिल चिद्रावार, उपप्राचार्य प्रा. ऊतमकुमार कांबळे , पर्यवेक्षक प्रा. संग्राम पाटील , कार्यालय अधीक्षक गोविंद जोशी यांच्यासह सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी यांनी आभिनंदन केले आहे.

Previous articleमेनोपाॅज- निसर्ग चक्राचा भाग
Next articleपरभणीत बस पुलावरून खाली कोसळली; २५ प्रवासी जखमी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.