Home भंडारा लालबहादूर शास्त्री शाळेची शासकीय जमीन श्रीमंताच्या घशात रिज रद्द करण्याची मागणी निवासी...

लालबहादूर शास्त्री शाळेची शासकीय जमीन श्रीमंताच्या घशात रिज रद्द करण्याची मागणी निवासी जिल्हाधिकारी यांना निवेदन

116

Yuva maratha news

IMG_20240313_145701.jpg

 

लालबहादूर शास्त्री शाळेची शासकीय जमीन श्रीमंताच्या घशात

रिज रद्द करण्याची मागणी निवासी जिल्हाधिकारी यांना निवेदन

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) शहरातील लालबहादूर शास्त्री शाळा ही इंग्रजांच्या काळातील शाळा असून माजी विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी स्वतःच्या पैशाने झाडे लावून सौंदर्यकरण केले होते. त्यामुळे शाळेचे सुशोभीकरण झाले होते. मुलांना ऑक्सिजन मिळत होते. मात्र त्या जागेवर भंडारा शहरातील गब्बर श्रीमंत लोकांची नजर त्यावर गेली. त्या शाळेची आवार भिंत तोडून ती जागा दुकाने बांधण्यासाठी मुख्य कार्यपालन अधिकारी जिल्हा परिषद भंडारा यांच्या मार्फत त्यांच्या अधिकार क्षेत्रात येत असल्यामुळे त्यांनी प्रति वर्ष १०० रुपये स्क्वेअर मीटर प्रमाणे तीस वर्षाकरिता गब्बर श्रीमंत लोकांना दिली. ही बाब माहिती अधिकारात उघड झाली .तीस वर्षाकरिता भंडारा शहरातील श्रीमंत नामावंत व पत्रकार लोकांना लीजवर शासकीय जागा दिली आहे या श्रीमंत आणि पत्रकार लोकांच्या दबावामुळे मुख्य पालन अधिकारी जिल्हा परिषद भंडारा यांनी लालबहादूर शास्त्री शाळेच्या लगत असलेल्या फुटपाथ दुकानदारांना हटवून त्यांच्या उदरनिर्वाचा साधन हिरावून घेतला व त्यांना बेरोजगार केले. त्यांच्यावर उपासमारीची परिस्थिती निर्माण झाली आहे. गरिबी श्रीमंत असा भेद निर्माण केला त्यामुळे लालबहादूर शास्त्री शाळा येतील श्रीमंत आणि पत्रकारांना लीजवर दिलेली शासकीय जागेची आणि दुकानाची तत्काळ लीज रद्द करावा व फुटपाथ दुकानदारांना ती जागा व गाळे उपलब्ध करून देण्यात यावेअसे निवेदन निवासी जिल्हाधिकारी स्मिता बेलपात्रे, मुख्य कार्यपालन अधिकारी भंडारा नगरपरिषद भंडारा यांना अन्यायग्रस्त फूटपाथ दुकानदार संघर्ष समितीचे अध्यक्ष विष्णुदास लोणारे सचिव चंद्रशेखर खोब्रागडे मुकेश बिरंमगडे , रवी भजनकर तौफिक शेख, अर्षद अली ,अर्चना देशकर, शुभम घडोले ,नंदकिशोर गजघाटे ,शंकर बावनकुळे ,विष्णू कुंभलकर ,तौशिप सय्यद यांनी दिले आहे.

Previous articleमहासभा एकनिष्ठेची!
Next articleमा.खा. राहुलजी गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या महाराष्ट्र पर्वाची सुरुवात आज नंदुरबार येथून करण्यात आली
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.