
आशाताई बच्छाव
थरारक आपघात! परळी-गंगाखेड रस्त्यावर खोदकाम; चालता ट्रक कोसळला खड्ड्यात चालक व सहाय्यक जखमी
_वडगाव वसाहत जवळ आपघात: नागरिकांच्या सतर्कतेने वाचले दोन जीव_
परळी दि १० राष्ट्रीय महामार्ग क्र.३६१ फ वर सध्या गंगाखेड-परळी दरम्यान रस्त्याचे काम सुरु आहे.परळीपासुन जवळच असलेल्या वडगाव वसाहत जवळ काल सायंकाळी ०५ वा. सुमारास थरारक आपघात घडला. रस्त्यावर दोन्ही बाजुंनी खोदकाम करण्यात आलेले आहे. गंगाखेडकडून येणारा एक ट्रक रस्त्याच्या बाजुने असलेल्या खड्ड्यात जाउन कोसळला. चालता ट्रक कोसळत असतांनाचा थरार रहदारीच्या रस्त्यावर बघायला मिळाला.या आपघातात चालक व सहाय्यक असे दोन जण जखमी झाले. सुदैवाने नागरिकांच्या सतर्कतेनमुळे दोन जीव वाचले आहेत.
परळी – गंगाखेड रस्त्यावरील दगडवाडी ते वडगाव वसाहत यादरम्यान पुलाचे व रस्त्याचे काम करण्यासाठी खोदकाम करण्यात आले आहे. याठिकाणी दि.०९ मार्च रोजी सायं.०५:०० वा.सुमारास गंगाखेडकडून येणारा ट्रक क्रमांक एम एच १२ एन एक्स ८३६७ वेगाने येत असताना रस्त्याचा अंदाज न आल्याने चालकाचा ताबा सुटला.चालता ट्रक रस्त्याच्या कडेला जात खड्ड्यात जावून कोसळला. या आपघातात चालक व अन्य एकजण ट्रकच्या कॅबिनमध्येच आडकून पडले होते. मात्र हा थरारक आपघात घडत असतांना रस्त्यावरील जाणारी वाहने व रस्त्याच्या कामावरील लोकांनी बघितलेले होते.तातडीने या नागरिकांनी मदतकार्य करुन अडकलेल्या दोघांना बाहेर काढले.या आपघातात ट्रक चालक दयानंद आत्माराम पुयनर वय ३४ रा.पांगरी ता.गंगाखेड व सहाय्यक महादेव गंगाधर कोटंबे वय २९ रा.राणीसावरगाव ता.गंगाखेड हे जखमी झाले असुन त्यांच्यावर परळी वैजनाथ उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.