Home अमरावती मेळघाटच्या या गावातील मुले गेली कुठे?पाचवी पर्यंत वर्ग, २ शिक्षक आणि विद्यार्थी...

मेळघाटच्या या गावातील मुले गेली कुठे?पाचवी पर्यंत वर्ग, २ शिक्षक आणि विद्यार्थी फक्त १.

139

आशाताई बच्छाव

IMG_20240304_202342.jpg

मेळघाटच्या या गावातील मुले गेली कुठे?पाचवी पर्यंत वर्ग, २ शिक्षक आणि विद्यार्थी फक्त १.
———-
दैनिक युवा मराठा
पी एन देशमुख
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.

अमरावती जिल्ह्यातील मेळघाट मध्ये माडी झडप गावातील शिक्षण क्षेत्राचा अजब खाक्या .४०० लोकसंख्येच्या गावात पहिली ते पाचवी पर्यंतच्या जिल्हा परिषद शाळेत दोन शिक्षक तैनात असली तरी एकमेव विद्यार्थी असल्याचा प्रकार अमरावती जिल्ह्यातील मेळघाट मध्ये दुर्गम भागात दिसून आला माडीझडप येथे पाहायला मिळत आहे. मग या गावातील मुले गेली कुठे, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. विदर्भाचे नंदनवन म्हणून सर्व दूध प्रसिद्ध असलेल्या अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील शेवटच्या टोकावर माडी झडप हे आदिवासी बहुलगाव आहे. रोजगार अभावी येथील आदिवासी कुटुंबीय स्थलांतर करीत असल्याचे वास्तव आहे. याचा फटका त्याच्या मुलाबाळांना बसतो. माडी झडप येथील शाळा ही अमरावती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने अवागड या केंद्राची जोडले आहे. इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंत या शाळेत वर्ग असून दोन शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यापैकी एक शिक्षक गावातच मुक्कामी राहतात तर एक शिक्षक बाहेर गावावरून ये-जा करतात. शाळा आणि विद्यार्थी मेळघाटात जिल्हा परिषद च्या शाळेमध्ये विज नाही, पाणी नाही, पायाभूत सुविधा नाही हळूहळू मेळघाटातून जिल्हा परिषदेच्या शाळा बंद होत आहे. गट महिन्या पूर्वी माडीझडप आमच्या प्रतिनिधींनी भेट दिली असता पटावर एकच विद्यार्थ्यांनी पहिल्या वर्गात असल्याचे दिसून आले. पहिली ते पाचवी पर्यंत येथे वर्ग असून दोन शिक्षकांची नियुक्ती केलेली आहे राजकीय नेते, पालक, प्रशासन आणि समाजाने देशाचे भवितत्त्व सुरक्षित ठेवण्यासाठी शाळा शिक्षक आणि विद्यार्थी वाचण्यासाठी पुढे येणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया खोज संस्थेचे बंड्या साने यांनी आमच्या प्रतिनिधींना माहिती दिली.

Previous articleउज्वलाच्या ब्युटी पार्लरचे उद्घाटन – गर्ल गॉसिप
Next articleअमरावती मनपातील अनियमितते प्रकरणी विभागीय चौकशीचे संकेत, विरोधी पक्षनेते दानवे यांची मंत्रालयात बैठक.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.