
आशाताई बच्छाव
मैत्री व्हायला वेळ लागत नाही, पण खरा मित्र व्हायला वेळ लागतो.
दैनिक युवा मराठा
निफाड नाशिक प्रतिनिधी रामभाऊ आवारे
मैत्री हा शब्द आठवताच प्रथम डोळ्यांसमोर उभी राहते ती कृष्ण-सुदामा यांची मैत्री । महाभारताच्या काळातली ही मैत्री. पण भारताच्या इतिहासात ती अमर होऊन बसली । कृष्ण-सुदाम्याच्या मैत्रीची ह्या कथेचं नुसते स्मरण झाले तरी डोळ्यात पाणी येते. दोन व्यक्तींमध्ये मैत्रीची भावना केवढी महान असू शकते हे ही कथा सिद्ध करते.अशीच श्री कृष्णा ची महाभारतकालीन अजून एक मैत्रीची एक कथा प्रसिद्ध आहे आणि ती म्हणजे कृष्ण आणि अर्जुन ह्यांची युद्धात अर्जुनाबद्दलच्या असणाऱ्या भावना मुुुळे कृष्ण अर्जुन चा सारथी झाला, पण कृष्ण लढला नाही त्याने अर्जुनाला युद्ध करायला लावले.कृष्णाच्या आणि अर्जुनाच्या बाबतीत मैत्रीचे रूपांतर भक्तिभावात झाले.
मैत्री व्हायला वेळ लागत नाही, पण खरा मित्र व्हायला वेळ लागतो! मैत्री जुळते ओळखीमुळे, पण ओळख झाल्यानंतर त्या व्यक्तिच्या बरोबर वेळ घालवल्यावर, त्याच्या सुख-दु:खात सामील झाल्यानंतर तयार होतो तो खरा मित्र अन तिच खरी मैत्री!
वय, जात, धर्म यांना न मानणारी
कधी हसवणारी तर कधी रडवणारी
मैत्री महणजे एकमेकाना सावरणारी
समजून घेणारी, सुखदुखात सहभागी होऊन
मदतीचा हात पुढे करणारी !
कुणावर जबरदस्ती करून आपली मैत्री त्याच्यावर थोपविता येत नाही. मैत्रीमध्ये एकमेकांबद्दल मनापासून काळजी असते प्रेम वाटायला पाहिजे. ती भावना मनात रूजायला हवी तरच मैत्री आयुष्यभर टिकते. आपले नातेवाईक जन्मानेच आपल्याला मिळालेले असतात पण आपले मित्र मैत्रिणी तरी आपण निवडू शकते. अनेक वेळेला रक्ताच्या नात्याएवढेच स्नेहाचे नाते जवळचे होऊन जातात.
रामभाऊ आवारे
प्रदेश कार्याध्यक्ष-वारकरी मंच महाराष्ट्र राज्य