
आशाताई बच्छाव
विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम करून उज्ज्वल यश संपादन केले पाहिजे
कोटमगाव विद्यालयात इ.१०वी च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभात मगन केदारे सर यांचे प्रतिपादन
दैनिक युवा मराठा
रामभाऊ आवारे निफाड
विद्यार्थ्यांनी परीक्षा देताना परावलंबी न रहाता जिद्द चिकाटी साहस व कठोर परिश्रम करून परिक्षेला सामोरे गेले पाहिजे .आपल्यात असलेली क्षमता ओळखून यश मिळविले पाहिजे. अशक्य काहीच नाही अपयशाने खचू नका, अपयश म्हणजे पराभव नाही असे प्रतिपादन कोटमगाव विद्यालयाचे आदर्श शिक्षक मगन केदारे सर यांनी केले आहे.
कोटमगाव विद्यालयात आयोजित इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देताना ते बोलत होते.
यावेळी विद्यालयातील अशोक गलांडे सर यांनी शुभेच्छा देताना म्हटले की, असे वर्तन करा की, आपल्याला कधीही, कुणीही बघेल तेव्हा त्याला आनंद वाटला पाहिजे. आपल्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती अनिता माणिक मढवई मॅडम एक आदर्श मुख्याध्यापिका आहे.पदाचा टेंभा न मिरवीता स्वतःही २२/२४तास अध्यापन करतात.शिक्षकही आपल्या जबाबदाऱ्या स्वतःहून पार पाडतात.साधी राहणीमान उच्च विचार असे मॅडमचे व्यक्तिमत्त्व आहे असे सांगितले.
कोटमगाव तालुका निफाड येथील माणिक रघुनाथ मढवई माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ नुकताच पार पडला. प्रथमतः सरस्वती मातेच्या व मढवई सरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती अनिता माणिक मढवई होत्या.प्रमुख पाहुणे म्हणून लासलगावचे प्रतिष्ठित व्यापारी राजु राणा, व प्रतिष्ठित नागरिक रामभाऊ होळकर हे होते कार्यक्रमाचे नियोजन इ.१०वी वर्गशिक्षक गलांडे ए. पी.सर यांनी केले.श्री राजू राणा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना अनेक उदा.दिले. मढवई सरांच्या आठवणीने राणाजी काहीसे भावुक झाले होते.शाळेचा प्रगतीचा इतिहास त्यांनी सांगितला. मुख्याध्यापिका श्रीमती अनिता मढवई मॅडम यांनी कॉपी न करता अभ्यास करून बोर्ड परीक्षेत यश मिळवा असे सांगितले. व शाळेचे दरवाजे तुमच्या साठी सदाही उघडेच असतील असे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.देवरे प्राची व समीक्षा गांगुर्डे यांनी केले.विद्यालयाचे आदर्श शिक्षक मगन केदारे सर यांनी अतिशय आपल्या नेहमीच्या परखड विनोदी शैलीत मार्गदर्शन केले.श्री.गांगुर्डे सर यांनी परीक्षेला जाण्यापूर्वी घ्यावयाची काळजी व इतर महत्वाच्या सूचना विद्यार्थ्यांना दिल्या.श्री कदम यांनीही अनमोल असे मार्गदर्शन केले .इ.१०वी .च्या विद्यार्थ्यांपैकी मुख्यमंत्री ओम शिरसाठ,वैष्णव शिरसाठ, यश गुरगुडे, सचिन देवरे,शिवाजी रायते, कू.सविता मोरे,कोमल कराटे,श्वेता पगारे,प्राची देवरे,समीक्षा गांगुर्डे, प्रांजल रसाळ,राजेश्वरी रसाळ. यांनी आपल्या शिक्षकांविषयीच्या, व शाळेविषयी आठवणी व विनोदी किस्से व आठवणी सांगितल्या.विद्यार्थ्यांनी विद्यालयाच्या ग्रंथालयासाठी ‘छावा,’ कादंबरी सप्रेम भेट दिली..भिलोरे काका यांनी विद्यार्थांसाठी छान मिसळ पाव बनविली.ते नेहमी विद्यार्थांसाठी मनोभावे वेगवेगळे पदार्थ विविध कार्यक्रम प्रसंगी बनून देतात.त्यातून त्यांचा मनाचा मोठेपणा दिसून येतो.विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापिका, व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचा शाल, गुलाबपुष्प देऊन गौरव केला.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी गलांडे सर, केदारे सर, गांगुर्डे सर ,कदम सर ,दिवटे सर , देवडे सर तसेच प्रेम केदारे, साई शिंदे,ओम शिरसाठ,सार्थक गुरगुडे ,आदित्य केंदळे, स्वयम् शिरसाठ, वैभव केंदळे,गीता पवार, सृष्टी केंदळे,रसिका सुपेकर,सविता मोरे. वैभवी केंदळे,लकी डांगे,गुणगुण,यांनी विशेष परिश्रम घेतले.