Home जालना मराठा आंदोलकांवर लाठीहल्ला केल्याप्रकरणी पोलीस निरीक्षकांची चौकशी करुन निलंबित करा – माजी...

मराठा आंदोलकांवर लाठीहल्ला केल्याप्रकरणी पोलीस निरीक्षकांची चौकशी करुन निलंबित करा – माजी आमदार संतोष सांबरे यांचे गृहमंत्री व पोलीस अधिक्षकांना निवेदन

89

आशाताई बच्छाव

IMG_20240224_195159.jpg

मराठा आंदोलकांवर लाठीहल्ला केल्याप्रकरणी पोलीस निरीक्षकांची चौकशी करुन
निलंबित करा – माजी आमदार संतोष सांबरे यांचे गृहमंत्री व पोलीस
अधिक्षकांना निवेदन
जालना, दि. २४(प्रतिनिधी दिलीप बोंडे)-बदनापूर येथे मराठा समाज आंदोलकांवर लाठीहल्ला
करणार्‍या पोलीस निरीक्षक सुदाम भागवत यांना निलंबित करून प्रकरणाची
चौकशी करावी, या मागणीचे निवेदन माजी आमदार संतोष सांबरे यांनी गृहमंत्री
व पोलीस अधीक्षक जालना यांना दिले आहे.
गृहमंत्री व पोलीस अधिक्षक जालना यांना दिलेल्या निवेदनात  सांबरे यांनी
म्हटले आहे की,बदनापूर तालुक्यातील मौजे धोपटेश्वर येथे मराठा आंदोलनाचे
प्रणेते मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सकल मराठा समाजाच्या
वतीने २४ फेब्रुवारी रोजी रास्ता रोकोचे आयोजन करण्यात आले होते. या
रास्ता रोकोची पुर्वकल्पनाही पोलिस निरिक्षक, पोलीस ठाणे बदनापूर यांना
दिलेली होती. रास्ता रोको आंदोलन हे संवैधानिक व अत्यंत शांततेच्या
मार्गाने सुरु असतांना अचानकपणे बदनापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक
सुदाम भागवत यांनी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला.
पोलिस निरिक्षक सुदाम भागवत व त्यांच्या सहकार्‍यांनी या रास्ता रोको
आंदोलनाच्या ठिकाणी उपस्थित असणार्‍या युवक, महिला व लहान मुलांवर
अमानुषपणे लाठी हल्ला केला असुन यामध्ये अनेक युवक, महिला व लहान मुले
जखमी झालेले आहे. शांततेच्या व संवैधानिक मार्गाने सुरु असलेल्या रास्ता
रोको आंदोलनाप्रसंगी आंदोलकांवर अमानुषपणे लाठीहल्ला केल्याप्रकरणी पोलिस
निरिक्षक सुदाम भागवत व त्यांच्या सहकार्‍यांना निलंबीत करुन या
प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी गृहमंत्री व पोलीस अधिक्षकांकडे
माजी आमदार संतोष सांबरे यांनी केली आहे.

Previous articleचिंता
Next articleविद्यार्थ्यांच्या करिअरसाठी परिसर मुलाखतीची आवश्यकता – गिरीश देशपांडे.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.