Home नाशिक विजयनगर परिसरातील हळदी कुंकू समारंभ साजरा

विजयनगर परिसरातील हळदी कुंकू समारंभ साजरा

225

आशाताई बच्छाव

IMG_20240218_072410.jpg

विजयनगर परिसरातील हळदी कुंकू समारंभ साजरा

सुदर्शन बर्वे (भगूर शहर प्रतिनिधी) आपला महाराष्ट्र हा अनेक विविधतेने नटलेले असून अनेक सण उत्सव साजरा करणारा आहे यातच जानेवारी महिन्यात येणार्‍या मकर संक्रांत हा सण या सणाला घरोघरी हलदी कुंकू चा समारंभ साजरे केले जाते तसेच अनेक भेट वस्तू महिलांना वाण म्हणून वाटले जाते एक मेकिंना हळद कुंकू लावून संम्मान केला जातो या सणाचे आवचित्त साधून गेल्या ८ फेब्रुवारी २०२४ रोजी न्यू पंचदिप हाऊसिंग सोसायटी विजयनगर या ठिकाणी पहिल्यांदाच मोठ्या उत्साहात हळदी कुंकाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला आणि सर्वांनी मनापासून सहभाग घेतला. आणि हा हळदी कुंकूवाचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नलिनी देशमुख यांनी केले व सर्व ज्येष्ठ महिलांना स्टेजवर बसवण्यात आले. पाटील ताई, झुटे, वराडे, दळवी, निकम, सोनवणे, घुगे, सांगळे, वारुंगसे, शिल्पा, लाजरी, शुभांगी यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे सर्व महिलांना हळदी कुंकूचे वान देऊन आणि अल्पोहार देऊन हसत खेळत खूप छान कार्यक्रम पार पडला.

Previous articleदेगलूर येथे मराठा आरक्षण व मा.जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून रास्तारोको आंदोलन संपन्न.
Next articleनुतन प्राथमिक विद्या मंदिर शाळेत स्नेहसंमेलनल साजरे
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.