Home नाशिक संघर्षवादी वाटसरू ते राज्यस्तरीय “शिवछत्रपती सन्मान” पुरस्काराचे मानकरी मा.श्री. राजेंद्र पाटील राऊत…!

संघर्षवादी वाटसरू ते राज्यस्तरीय “शिवछत्रपती सन्मान” पुरस्काराचे मानकरी मा.श्री. राजेंद्र पाटील राऊत…!

313

आशाताई बच्छाव

IMG-20240214-WA0195-removebg-preview.png

संघर्षवादी वाटसरू ते राज्यस्तरीय “शिवछत्रपती सन्मान” पुरस्काराचे मानकरी मा.श्री. राजेंद्र पाटील राऊत…!
उद्या रविवार दिनांक १८ फेब्रुवारी २०२४ रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या पुर्वसंध्येला राज्यस्तरीय “शिवछत्रपती सन्मान”पुरस्कार २०२४ युवा मराठा न्यूजपेपर्स अँन्ड वेब न्यूज चॅनलचे मुख्य संपादक तथा संस्थापक मा.श्री. राजेंद्र पाटील राऊत यांना मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात येऊन सन्मानित केले जाणार आहे.त्यानिमित हा विशेष लेख.-श्रीमती आशाताई बच्छाव व्यवस्थापकीय संपादक युवा मराठा न्यूज नेटवर्क
अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे जन्म झालेले राजेंद्र पाटील राऊत यांचे संपूर्ण जीवन नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील कौळाणे (नि) गावी आजोळी गेलेले आहे.त्यांचे शालेय शिक्षण व बालपण याच भागात गेले असून, लहानपणापासून काही तरी करून दाखविण्याची अंगी असलेली तळमळ त्यांना कधीच स्वस्थ व शांत बसू देत नव्हती.त्यांनी अल्पवयातच विविध वृत्तपत्रांत या कौळाणे भागाचे प्रतिनिधित्व करुन निर्भिडपणे या भागातील प्रश्नाना वाचा फोडलेली आहे.तर त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून माजी खासदार कै.हरिभाऊ शंकर महाले यांनी कौळाणे (नि) गावात एका जंगी कार्यक्रमातून राजेंद्र पाटील राऊत यांना उत्कृष्ट व निर्भिड पत्रकारितेचा रोख एकवीसशे रुपये व सन्मानचिन्ह देऊन सन १९९९ साली यथोचित सन्मान केलेला आहे. राजेंद्र पाटील राऊत यांनी आजवर अनेक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी विविध आंदोलने केलेली आहेत तर वेगवेगळ्या संघटनांवर त्यांनी विविध पदे भुषविली आहेत.सन २००३ साली साप्ताहिक/ दैनिक युवा मराठा वृत्तपत्रांची स्थापना करुन जनसामान्यांच्या हक्कासाठी लेखनीच्या माध्यमातून प्रखर लढा उभारलेला आहे.शिवाय गत काही वर्षांपूर्वी पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या महापुरात संसार उध्वस्त झालेल्या गोरगरीब नागरिकांना प्रत्यक्ष भेटून सुमारे अडीच लाख रुपयांची मदत अन्नधान्य स्वरूपात केलेली आहे.तर मालेगावाच्या रस्त्यावर फिरुन लाचारीचे जीवन जगणाऱ्या महिलांना मानाची साडी चोळी व रोख रक्कम देऊन त्यांचा सन्मान केला आहे.शिवाय राजेंद्र पाटील राऊत यांच्या या निस्वार्थ व निष्काम कार्याची दखल घेऊन ठाणे येथील क्राईम इन्वीस्टेगेशन वृत्तपत्राने सन २०२० यावर्षी “समाजभूषण” पुरस्कार सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविले आहे.त्याशिवाय मालेगाव तालुका टायगर ग्रुप संघटनेच्या वतीने सन २०२२ मध्ये राजेंद्र पाटील राऊत यांना प्रविण नानाजी शेवाळे यांनी “संघर्षयोध्दा” पुरस्कार देऊन गौरविले आहे.तर सन २०२३ मध्ये पुणे येथील महाराष्ट्र टि.व्ही.न्युजच्या वतीने “संविधान रक्षक” पुरस्कार देऊन मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले आहे. राजेंद्र पाटील राऊत यांची संघर्षाच्या वाटेवरून सुरू असलेली काटेरी वाटचाल अत्यंत खडतर व बिकट असून त्यांनी पावलोपावली अनंत अडचणींवर मात करून व-हाणे ता.मालेगाव या गावी आश्रयआशा फाऊंडेशन या सामाजिक संस्थेची स्थापना करून अनेक समाजोपयोगी कामे संस्थेच्या माध्यमातून राबविली आहेत.तर आश्रयआशा फाऊंडेशन प्रणित युवा मराठा महासंघ हि सामाजिक संघटना स्थापन करून आज महाराष्ट्रातल्या पंचवीस जिल्ह्यातील विविध भागात महासंघाचे कार्य उभारून छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्श विचारसरणी नुसार अठरा पगड जाती धर्माच्या बारा बलुतेदारांना सोबत घेऊन लोकचळवळ उभी केली आहे.जीवनभर संघर्ष करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना महाराष्ट्र भरातील गाव खेड्यात पोहचविण्याचे कार्य करणाऱ्या राजेंद्र पाटील राऊत यांना यावर्षीचा लाभलेला “शिवछत्रपती सन्मान”पुरस्कार २०२४ हा आम्हां युवा मराठा परिवारातील सगळ्यांचं पदाधिकारी व कार्यकर्ते बंधू साठी निश्चितच आदर्शवत व भुषणावह ठरत आहे.पुन्हा एकदा राजेंद्र पाटील राऊत यांचे मनापासून खूप खूप अभिनंदन व भावी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!