
आशाताई बच्छाव
अनसिंग ग्रामपंचायत मध्ये १५ वित्त आयोगाच्या कामांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करा- यश चव्हाण
अनसिंग ग्रामपंचायत मध्ये १५ वित्त आयोगाच्या निधीतून नाली व रस्त्याचे बांधकाम कामे झाले परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे यश चव्हाण यांनी गटविकास अधिकारी यांना निवेदन देऊन हे कामे निकृष्ट दर्जाचे झाले आहे याची सखोल चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली व तसेच अनसिंग ग्रामपंचायत चे सचिव हे ग्रामपंचायत कार्यालयात उशिरा येणे, विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचे फोन नंबर ब्लॉक केले जे ग्रामपंचायत मध्ये सदस्य आहेत त्यांना सुध्दा इग्नोर करणे आणि मुजोरी ने बोलतात यांच्या वर सुद्धा कारवाई करण्यात यावी यांनी अनसिंग ग्रामपंचायत च्या हेडक्वार्टर मध्ये राहण्याचे आदेश देण्यात यावे अशी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे यश चव्हाण यांनी गटविकास अधिकारी यांना निवेदन देऊन विनंती केली व गटविकास अधिकारी यांनी चौकशी करण्याचे विशेष अधिकारींना आदेश दिले.