राजेंद्र पाटील राऊत
कुसळंब ता. बार्शी ग्रामपंचायत येथील विविध ९३ लाख १५ हजार रूपये विकास कामांचा उद्घाटन समारंभ
युवा मराठा न्युज पेपर अँड ऑनलाईन वेब पोर्टल महादेव घोलप सोलापूर
बार्शी तालुक्यातील कुसळंब येथे आमदार राजाभाऊ राऊत यांच्या शुभहस्ते ९३ लाख १५ हजार रुपये विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले तसेच कुसळंब गावासाठी विविध योजनांच्या माध्यमातून विकास कामे मंजूर केल्याबद्दल गावकऱ्यांच्या वतीने आमदार राजाभाऊ राऊत यांचा कृतज्ञता सोहळ्यातून नागरी सत्कार करण्यात आला.कुसळंब येथे आमदार राजाभाऊ राऊत यांच्या शुभहस्ते २५/१५ अतर्गत गावांर्तगत सिमेंट काँक्रीट रस्त्यासाठी ३० लाख,कृषी विभाग व पाटबंधारे विभाग अंतर्गत २१ लाख,सुजित काटकर शेत ते गाव ओढा पाणंद रस्त्यासाठी २५ लाख विकास कामांचे उद्घाटन व घनकचरा व्यवस्थापन व सांडपाणी व्यवस्थापन साठी ६ लाख १५ हजार,जि.प.शाळा कुसळंब वाॅल कंपाऊंड व पेव्हीग ब्लॉक बसविण्यासाठी ५ लाख,पं.स. बार्शी यांच्या अंतर्गत विहीर दुरूस्ती साठी ३ लाख,पाणी पुरवठा डी.पी.साठी २ लाख इत्यादी कामाचे लोकार्पण करण्यात आले.
देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी ग्रामीण भागाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला असुन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून आमदार राजाभाऊ राऊत हे ग्रामीण भागाच्या विकासासाठी कटिबद्ध आहेत.