
आशाताई बच्छाव
‘मी तुझ्या प्रेमात जगताना’ मकरंद पाटील लिखित पुस्तक पत्रकार संजीव भांबोरे यांना भेट
नागपूर -संघर्ष बहुउद्देशीय संस्था नागपूर द्वारा आयोजित अखिल भारतीय कर्मयोगी संत गाडगेबाबा साहित्य व कला मंच नागपूरच्या वतीने आज दिनांक 28 जानेवारी 2024 ला राज्यस्तरीय कर्मयोगी संत गाडगेबाबा काव्य पुरस्कार व समाज भूषण पुरस्काराचे व नवोदित काव्य संमेलन विश्वशांती वेणावन बुद्धविहार हिंगणा येथे राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ‘मी तुझ्या प्रेमात जगताना” ‘एक प्रेम काव्य, मकरंद पाटील लिखित पुस्तक प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांना भेट देण्यात आली.