
आशाताई बच्छाव
संताजी मंगल कार्यालय येथे ओबीसी (विजे /एटी /एसबीसी) प्रबोधन कार्यकर्ता मेळावा संपन्न
संजीव भांबोरे
भंडारा( जिल्हा प्रतिनिधी)- ओबीसी जनगणना सेवा संघ भंडारा जिल्ह्याच्या वतीने संताजी मंगल कार्यालय येथे दिनांक 28 /01/2024 ला दुपारी 1:00 वाजता ओबीसी (विजे/ एन्टी /एसबीसी) प्रबोधन मेळावा संपन्न झाला
या कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक एँडोकेट, इंजिनियर,प्रदीप ढोबळे संस्थापक अध्यक्ष, ओबीसी सेवा संघ या कार्यक्रमाचे अध्यक्ष सदानंद इलमे अध्यक्ष ओबीसी जनगणना परिषद भंडारा डॉ. बाळकृष्ण सावेँ अध्यक्ष ओबीसी जागृती मंच, प्रमुख अतिथी भैय्याजी लांबट राज्य उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ, परमात्मा एकचे मुख्य मार्गदर्शक श्री प्रभाकर वैरागडे गोपाल सेलोकर अध्यक्ष जिल्हाध्यक्ष ओबीसी सेवा संघ, नेपाल चिचमलकर ओबीसी महिला राज्य अध्यक्ष मंगलाताई वाडीभस्मे,ओबीसी सेवा संघ महिला राज्य उपाध्यक्ष,अनिता बोरकर, जिल्हाध्यक्ष ललिता देशमुख मॅडम नेपाल चीचमलकर प्रकाश भुरे शिरपाते सर या प्रबोधन मेळाव्यात विचार मंचावर उपस्थित होते या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व माँ जिजाऊ, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण अर्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. डॉक्टर बाळकृष्ण सार्वे मार्गदर्शन करताना म्हणाले ओबीसी शेतकरीआहे या शेतकरी एका धाण्याचे शभंर दाने करतो,तो हुशार आहे तो एकत्र येत नाही तो एकत्र येने गरजेचेआहे असे म्हटले उमेश कोरम ओबीसी युवा मंच,यांनी जनगणना यात्रेचे विदर्भ रुप रेषा सांगितले.डॉ, लांजेवार यांनी म्हटले की नौकरी करनाऱ्याना एकत्र येण्याची गरज आहे,कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक एडवोकेट, इंजिनियर, प्रदीप ढोबळे यांनी प्रबोधन मेळाव्याला मार्गदर्शन करतांना म्हणाले, ओबीसी झोपलेल्या वाघ तो जागा झाला आणि त्याला संविधान कडलेला नाही, त्यात संविधानाच्या कलमा विषयी भरपूर माहिती दिली, कार्यक्रमाचे अध्यक्ष सदानंद इलमे यानी मार्गदर्शनात म्हणाले की,ओबीसी हा अंधश्रद्धात अडलेला त्याला अंधश्रद्धा तुन बाहेर काढने ते अतिशय महत्त्वाचे आहे या कार्यक्रमात भंडारा जिल्हा कार्यकारीणी पदाधिकाऱ्यांना प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले कार्यक्रमात प्रास्ताविक गोपाल सेलोकर यांनी केले तर सुत्रसंचालन गोपाल देशमुख यांनी केले आभार प्रदर्शन संजिव बोरकर यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी मनोज बोरकर, निकुळे सर.श्रीकृष्ण बांगडे वसंत काटेखाये, राजेश देशमुख सुभाष खंडाळीत तुळशीदास बांद्रे अनिल शेंडे प्रमोद सपाटे वर्षा बांगडे भावना निकोडे रंजना गभने रजनी घाटोळे प्रभा हलमारे प्रतीक्षा बोरकर यांनी अतिशय परिश्रम घेतले.