Home उतर महाराष्ट्र शिवस्मारकासह श्रीरामपूर जिल्हा मागणीसाठी विराट मोर्चा; हजारो श्रीरामपूरकर सहभागी…

शिवस्मारकासह श्रीरामपूर जिल्हा मागणीसाठी विराट मोर्चा; हजारो श्रीरामपूरकर सहभागी…

103

आशाताई बच्छाव

IMG_20240121_211826.jpg

शिवस्मारकासह श्रीरामपूर जिल्हा मागणीसाठी विराट मोर्चा; हजारो श्रीरामपूरकर सहभागी…

 

श्रीरामपूर (तालुका प्रतिनिधी दिपक कदम)- श्रीरामपूर जिल्हा कृती समिती व शिवप्रहारच्या वतीने शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवस्मारकासह (शिवपुतळा) सरकारने “श्रीरामपूर जिल्हा ” घोषित करावा हया मागणीकरिता विराट मोर्चा काढण्यात आला.
शनिवार दि. २० जानेवारी रोजी श्रीरामपूर शहरातील आझाद मैदान येथून मोर्चास सुरूवात झाली. सदरचा मोर्चा हा आझाद मैदान येथुन निघुन मेनरोडमार्गे -भगसिंगचौक- धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक, गिरमे चौक, तुळजाभवानी चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, महात्मा गांधी पुतळा मार्गे श्रीराम मंदिर चौकात आला. श्रीराम मंदिर चौकामध्ये मोर्चाचा समारोप करण्यात आला. यावेळी सरकारचे व प्रशासनाचे छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवस्मारकासह (शिवपुतळा) “श्रीरामपूर जिल्हा व्हावा या मागणीकडे लक्ष वेधण्यात आले. मोर्चामधील प्रभु श्रीराम, महाबली हनुमान, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुर्णाकृती पुतळ्यांनी लक्ष वेधले होते.
यावेळी नगर जिल्हयाचे विभाजन झाले तर श्रीरामपूर हाच नविन जिल्हा होणार नाहीतर जिल्हा विभाजन होणार नाही व इतर कोणत्याही ठिकाणी जिल्हा मुख्यालय होवू देणार नाही असे श्रीरामपूर जिल्हा कृती समितीचे अध्यक्ष प्रताप (नाना) भोसले यांनी सांगितले. तर शिवप्रहार प्रतिष्ठानचे प्रमुख माजी पोलीस अधिकारी सुरजभाई आगे यांनी सांगितले की, प्रभू श्रीरामांच्या नावाने म्हणजेच “श्रीरामपूर” हया नावाने भारतात जिल्हा अस्तित्वात नाही. तरी हिंदुस्थानातला श्रीरामांच्या नावाचा पहिला जिल्हा होण्याचा मान श्रीरामपूरला मिळावा. या विराट मोर्चात श्रीरामभक्त-शिवभक्त, व्यापारी, वकील, इंजिनियर, कामगार, राजकीय नेतेमंडळी, पदाधीकारी यांच्यासह शिवप्रहारचे मावळे प्रचंड मोठया संख्येने सहभागी झाले होते.

Previous articleअक्षदा कलश शोभायात्रेचे परिसरात उत्साहात स्वागत- केतन खोरे
Next articleशिवस्मारकासह श्रीरामपूर जिल्हा मागणीसाठी विराट मोर्चा; हजारो श्रीरामपूरकर सहभागी…
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.