आशाताई बच्छाव
गेवराईत मनोज जरांगे पाटील यांचे जंगी स्वागत; ५० जेसीबीच्या माध्यमातून त्यांच्यावर पुष्पवृष्टी
मोहन चव्हाण
ब्युरो चिफ बीड जिल्हा
बीड/गेवराई दि:२० मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे मुंबईकडे जात असताना गेवराई त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.यावेळी ५० जेसीबीच्या माध्यमातून त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली.त्यांच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी कमानी उभारण्यात आल्या होत्या यावेळी मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होते.मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगे पाटील मुंबईकडे दिनांक २० जानेवारीला रोजी सराटी आंतरवाली इथुन मुंबईकडे जात असताना त्यांचे गेवराई तालुक्यात सायंकाळी पाच वाजता आगमन झाले.त्यांच्या स्वागतासाठी सकाळपासूनच बच्चे कंपनी पासून वृद्धा पर्यंत मराठा समन्वयक रस्त्याच्या दुतर्फाला उभे होते.ठिकठिकाणी कमानी उभारण्यात आल्या होत्या… तसेच मराठा बांधवांसाठी पाण्याची सोय देखील करण्यात आली होती.गेवराई शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये त्यांच्या आगमन झाले यावेळी ५० जेसीबीच्या माध्यमातून त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. महाराजाची आरती झाली व त्यांचे स्वागत करण्यात आले.यावेळी शेकडो तोफांची सलामी देखील मनोज जरांगे पाटील यांना देण्यात आली
.मराठा लाख मराठा या घोषणेने शहर दणाणून गेले होते.तसेच मराठा बांधवांसाठी कोळगाव या ठिकाणी जेवणाची व्यवस्था करण्यात आली असून परिसरातील आसपासच्या ५० गावांनी भाजी भाकरी पिठलं अशा जेवणाची २० ठिकाणी सोय केली.तसेच ठिकठिकाणी पाण्याची देखील सोय करण्यात आले होती तर गेवराई शहरांमध्ये मराठा बांधवाच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांचे जंगी स्वागत करण्यात आले.यावेळी मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होते तर असंख्य गाड्यांचा ताफा त्यांच्याबरोबर होता. मराठा बांधवांनी खाण्यापण्याची सोय स्वतःच्या गाडीमध्ये सर्व साहित्य घेऊन मोठ्या संख्येने मराठा बांधव मुंबईकडे कुच करत होते. तर एक मराठा लाख मराठा घोषणेने गेवराई शहर दणाणून गेले होते.भगव्या झेंड्याने शहरात भगवे वादळ निर्माण झाले.
जय जिजाऊ जय शिवराय च्या घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला
मनोज जरांगे पाटील आज मुंबईकडे रवाना झाले असून लाखोच्या संख्येने मराठा आज एकवटलेला दिसला ऊन वारा ची तमा न बाळगता जरांगे पाटील आपल्या गावात येणार यासाठी स्वागत उत्सुक होते जरांगे पाटील यांच्या आगमनाने नवं चैतन्य संचारले होते ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार लाखो लोक होते.