आशाताई बच्छाव
जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारतही आता नवीन होणार!
मोहन चव्हाण
ब्युरो चिफ बीड जिल्हा
बीड दि:२० जानेवारी २०२४ बीड जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत ही आता नवीन होणार असून नवीन इमारत तीन मजली असणार आहे.याची निविदा मंजुरीसाठी मुंबईला पाठविण्यात आली आहे.बीड जिल्ह्यात असलेल्या मुख्य प्रशासकीय काही इमारतीचे नूतनीकरण करण्यात येण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.यानुसार यापूर्वी पंचायत समितीची इमारत नवीन जागी नव्याने चांगली प्रशस्त बांधण्यात आली आहे.यानंतर बीड तहसील कार्यालय असलेली प्रशासकीय इमारत पाडून त्या जागी नवीन इमारत बांधण्यास शासनाची मंजुरी मिळाली असून लवकरच इमारत पाडण्याचे काम सुरू होणार आहे.पंचायत समिती तहसील नंतर आता जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत पाडून नवीन इमारत बांधण्यासाठी निविदा प्रक्रिया तयार करण्यात आली असून साठी मुंबईला पाठविण्यात आली आहे.जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्य इमारतसाठी निविदा तांत्रिक मंजूर झाली आहे.आता अंतिम मंजुरीसाठी मुंबई येथील मंत्रालयात निविदा पाठविण्यात आली आहे.निवेदनुसार बीड शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत तीन मजली असणार आहे.त्याचे ऐकुन बांधकाम १३००० स्क्वेअर मीटर मध्ये होणार आहे. ग्राउंड फ्लोअरला पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था, फायर सेफ्टी,रेन हार्वेस्टिंग अशा अनेक बाबींचा समावेश करण्यात आला आहे. या इमारतीमध्ये प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र कार्यालय असतील असे नियोजन करण्यात आले आहे.