Home अमरावती लोकसभा निवडणुकीसाठी वातावरण अनुकूल: छत्तीसगड मध्यप्रदेश मधील पराभवातून मिळालेला धडा ही आम्ही...

लोकसभा निवडणुकीसाठी वातावरण अनुकूल: छत्तीसगड मध्यप्रदेश मधील पराभवातून मिळालेला धडा ही आम्ही विसरणार नाही–रमेश चेन्निथला.

106

आशाताई बच्छाव

IMG_20240119_075014.jpg

लोकसभा निवडणुकीसाठी वातावरण अनुकूल: छत्तीसगड मध्यप्रदेश मधील पराभवातून मिळालेला धडा ही आम्ही विसरणार नाही–रमेश चेन्निथला.
—————
दैनिक युवा मराठा
पी एन देशमुख
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.
केंद्र आणि राज्य हे दोन्ही सरकारी जन विरोधी आहे. त्यामुळे त्यांच्या प्रति लोकांमध्ये रोज आहे. हा रोज काँग्रेससाठी अनुकूल आहे. परंतु अशीच अनुकूल स्थिती मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये असतानाही काँग्रेसला पराभूत व्हावे लागले. हे मान्य करून त्या पराभवातून आम्ही धडा घेतल्याचे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी तथा केरळचे माजी उपमुख्यमंत्री रमेश चन्निथला यांनी अमरावती येथे कष्ट केले. काँग्रेसची संघटनात्मक बांधणी कशी आहे, हे माहीत करून घेत असतानाच लोकसभा निवडणुकीची तयारी कुठपर्यंत पोहोचली, हे जाणून घेण्यासाठी काँग्रेसच्या राष्ट्रीय समिती ने महाराष्ट्रात विभागणीय बैठक आयोजित केले आहे. त्यातील पहिली बैठक आज अमरावती पार पडली या बैठकीला मुद्दाम उपस्थित झालेला रमेश चेन्निथला यांनी वृत्तपत्र माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले बुथलेव्हलला असलेले यंत्रणा (बीएल ए) अशक्त असल्यामुळे त्यात दोन राज्यात काँग्रेस पराभव झाला. परिणामी येथून पुढे बउथ लेव्हल एजंट चे झाडे योग्य रीतीने मिळण्याचे काम सुरू झाले आहे. वंचित बहुजन आघाडीच्या”इंडिया”प्रवेशा याबद्दल बोलताना ते म्हणाले, प्रकाश आंबेडकर हे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून महाविकास आघाडी जवळ आले आहेत. त्यामुळे”इंडिया”तील त्यांच्या प्रवेशाबद्दल ठाकरे व पवार त्यांची बोलणी सुरू आहे. ती बोलली पूर्ण झाल्यावर ते आपोआपच इंडियाचे घटक होतील. मात्र आंबेडकर यांच्या “इंडिया” प्रवेशाबद्दल काँग्रेस आशीर्वाद असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आंबेडकर यांनी अलीकडेच काँग्रेसने मला न्याय यात्रेचे निमंत्रण दिले, परंतु अद्याप “इंडिया” मधील सहभागासाठीचे निमंत्रण दिले नाही. असा सवाल उपस्थित केला. त्यावर प्रतिक्रिया देताना चेन्निथला यांनी वरील भाष्य केले. यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, दोन माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण व पृथ्वीराज चव्हाण, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम सिद्दिकी, केंद्रीय समिती सदस्य अशीश दुवा, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, चंद्रकांत हंडोरे, शिवाजीराव मोघे, एडवोकेट यशोमती ठाकूर, डॉ सुनील देशमुख, आमदारबळवंतराव वानखडे, माजी आमदार प्रा. वीरेंद्र जगताप, बबलू शेखावत, मिलिंद चिमटे, रामेश्वर अभ्यंकर आदी उपस्थित होते.

Previous articleविजय ग्रंथ पारायण सोहळा सभा मंडपाचे भूमिपूजन–
Next articleराम मंदिर सोहळा;परळीत भाजपाच्या वतीने सोमवारी वैद्यनाथ मंदिर समोर दिपत्सव
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.