Home नांदेड करडखेड येथे महर्षी राजा भगीरथची जयंती

करडखेड येथे महर्षी राजा भगीरथची जयंती

164

आशाताई बच्छाव

IMG_20240117_212519.jpg

करडखेड येथे महर्षी राजा भगीरथची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली                    देगलूर-(संजय कोंकेवार) देगलूर तालुक्यातील करडखेड येथे बेलदार व सगर गवंडी समाजाचे आराध्य दैवत महर्षी राजा भगीरथ यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली.जयंतीच्या निमित्ताने राजा भगीरथ यांच्या फलकाचे महादेव मंदिर रोड करडखेड येथे अनावरण करण्यात आले.यावेळी हनुमान मंदिर ते महादेव मंदिर रोड पर्यंत मिरवणूक काढण्यात आली.यावेळी गावातील व आजूबाजूच्या परिसरातील बेलदार व सगर गवंडी समाजाचे कार्यकर्ते हजारोच्या संख्येने उपस्थित होते यावेळी राजा भगिरतेच्या प्रतिमेचे पूजन करून फलकाचे अनावरण करण्यात आले व नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यावेळी डॉ.आकाश देशमुख,पंकज देशमुख,गणपत शिळवणे,चंद्रकांत गजलवार,श्रीनिवास मंदिलवार, सिद्रामअच्चमवार(गुरुजी),निंबाळवाडीकर महाराज,हणमंत चिंनगुलवार,गंगाधर गजलवार,शंकर शिळवणे,बालाजी गजलवार,सुधाकर बेंजलवार,साई चिंनगुलवार,श्रीनिवास अंबलवाड,स्वप्निल अंबलवाड,आनंद वडमिलवार,गजानन चिंनगुलवार व यावेळी बेलदार व सगर गवंडी समाजाचे कार्यकर्ते व इतर गावातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.